प्रतिनिधी
औरंगाबाद : नीट संसार कर, प्रियकरासोबत अनैतिक संबंध ठेवू नको, असे वारंवार समजावून सांगूनही पत्नी ऐकत नसल्याचे पाहून संतापाचा पारा अनावर झालेल्या पतीने थेट पत्नीच्या प्रियकरालाच भोसकले. यात प्रियकर वाचला आहे, पण प्रकृती गंभीर आहे. पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रकरण असे आहे : जितेंद्र सुवर्णकार व अमोल मुद्रेवार हे दोघे मित्र. दोघेही एकाच अपार्टमेंटमध्ये (कासलीवाल मार्बल अपार्टमेंट) राहतात. जितेंद्र एका हॉटेलमध्ये मॅनेजर तर अमोल व जितेंद्रची पत्नी ब्युटीपार्लरचा व्यवसाय करतात. अमोलने जितेंद्रचा विश्वासघात केला आणि जितेंद्रच्या पत्नीशी सूत जुळवले. दोघांत शरीर संबंध निर्माण झाले. ही माहिती जितेंद्रला कळल्यानंतर त्याच्या पायाखालची वाळू सरकली पण त्याने संयमाने आणि शांततेने घेत पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या पत्नीने काही ऐकले नाही. अखेर जितेंद्रने अमोलचाच काटा काढण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री डाव साधून जितेंद्रच्या घरात घुसला. त्याच्या उजव्या छातीवर व डाव्या हातावर चाकूने वार केले. यात अमोल हा गंभीर जखमी झाला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अमोल गांगरून गेला आणि त्याने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी फ्लॅटच्या दिशेने जाऊन खात्री केली तेव्हा अमोल अंबादास मुद्रेवार (२८) रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याची पत्नी सारिका अमोल मुद्रेवार मदतीसाठी धावा करत होती. नागरिकांनी तातडीने अमोलला बीड बायपास रोडवरील कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. त्यांनी जखमी अमोलच्या पत्नीचा सारिकाचा जबाब नोंदवून जितेंद्रवर गुन्हा दाखल केला. जितेंद्र खयालीराम सुवर्णकार (३२, रा. कासलीवाल मार्बल, सातारा परिसर) बीड बायपास रोडवरील एका हॉटेलसमोर दिसला आणि त्याला अटक केली.