एक पोलिसवाला रास्ते में खडा होता है, इसलिए आप सारे लोग घर में आराम से सो सकते है. अमिताभ बच्चनच्या खाकी या गाजलेल्या चित्रपटातील हा डायलॉग सगळ्यांना आठवत असेलच. अवघ्या जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिस खात्यावर असते आणि ते ती पार पाडतही असतात. आज पोलिस खाते भ्रष्टाचाराच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे दिसून येते. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तैनात करण्यात येत असलेल्या पोलिसांकडूनच कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या घटनाही पहायला मिळतात. यामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे. या साèया बाबी खèया असल्या तरी सगळेच पोलिस भ्रष्टाचारी आहेत qकवा सारेच पोलिस कायद्याचे उल्लंघन करतात असेही नाही. दरवेळी पोलिस भ्रष्टाचारी असल्याचे चित्र रंगवून दाखविण्यात येते. त्याचवेळी उन्हाची, पावसाची अन् थंडीची पर्वा न करता डोळ्यात तेल घालून सदैव तैनात राहणाèया पोलिसांच्या समस्या, जनतेच्या संरक्षणासाठी त्यांना करावी लागणारी कसरत, राजकारण्यांकडून त्यातही सत्ताधाèयांकडून होणारा पोलिसांचा गैरवापर याकडे मात्र साèयांचेच दुर्लक्ष होताना दिसते. पोलीस जणू आपल्या घरात काम करणारे ‘रामा गडीङ्कच आहेत, अशा थाटात वावरणारे सत्ताधारी आणि राजकीय पक्षांचे नेते पोलिसांचा वापर करीत आले आहेत. त्याचवेळी आजवरच्या एकाही सत्ताधाèयाला पोलिसांसाठी काही करावे वाटलेले नाही qकवा एकानेही पोलिसांची बाजू उचलून त्यांच्यासाठी काही तरी केले आहे, असे एकही उदाहरण शोधूनही सापडण्याची सुतराम शक्यता नाही. उलट पोलिसांच्या अडचणींत दिवसेंदिवस भर पडणार आहे. महाराष्ट्राच्या आणि देशभरातील पोलिसांची अवस्था काय आहे, याचे चित्र आपण दरवेळी चित्रपटातून पहात आलो आहोतच. आज हेच पोलिस आता आणखी नव्या अडचणींत सापडलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. आम्ही कायदाच पाळत नाही, तर कायद्याचे संरक्षण करणाèया पोलिसांना काय जुमानणार, असे म्हणत पोलिसांना खुशाल तुडवण्याचे, त्यांच्या हल्ले करण्याचे धोरण काहींनी अंगिकारल्याचे काही घटनांवरून स्पष्ट होत आहे. म्यानमारमधील qहसाचाराच्या विरोधात निदर्शने ११ ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर निदर्शनांचे आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, qहसाचाराच्याविरोधात आयोजित या सभेत सहभागी झालेल्यांनीच नंतर qहसाचार घडवला. या समाजकंटकांनी त्यावेळी पोलिसांनाच टार्गेट केले. महिला पोलिसांचा विनयभंग केला. त्यांच्या साड्यांना आणि पोशाखांना हात घालण्याची qहमत या समाजकंटकांनी दाखवून दिली. अनेक पोलिसांना गंभीर जखमी होईपर्यंत मारहाण केली. जमावाने पोलिसांवर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना असेल असे नाही. पण ती इतरांनाही असे कृत्य करण्याची qहमत देणारी ठरली हे मात्र निश्चित. कारण तेव्हापासून आतापर्यंत पोलिसांना आणि त्यातही विशेषत: मुंबईतील पोलिसांना मारहाण करण्याच्या लक्षात याव्यात अशा चार घटना घडल्या आहेत. स्कॉटलंड यार्डच्या पोलिस यंत्रणेनंतर गुन्ह्यांच्या तपासामध्ये मुंबई पोलिस दलाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास लावला आहे. गुन्हेगारीला आळा घातला आहे. याच पोलिस दलातील धडाकेबाज आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाèयांनी खतरनाक गुंडांना आणि अंडरवल्र्ड डॉनना यमसदनी धाडून मुंबईतील अंडरवल्र्डचे साम्राज्य खालसा केले. मुंबई पोलिसांना घाबरूनच अनेक गुंडांना इथून गाशा गुंडाळून परदेशी धूम ठोकावी लागली आहे. याच पोलिस दलाने २८ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला प्राणांची बाजी लावून परतावला होता. याच पोलिसांमुळे त्यावेळी लाखो मुंबईकरांचे जीव वाचले. असा धडाकेबाज इतिहास असलेल्या मुंबई पोलिसांचा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वाटणारा दबदबा आता मात्र कमी झाला की काय, असेच पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांनी जनतेला वाटू लागले आहे. ११ ऑगस्टला पोलिसांना झालेल्या मारहाणीच्या पाश्र्वभूमीवर मुंबईचे पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल qसग यांनी पोलिसांना मारहाण करणाèया गुंडांना कायमचा धडा शिकविण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. पोलिसांना मारणाèयांच्या परदेशवारीवर गदा, त्यांचा वाहतूक परवाना कायमचा रद्द करणे, सरकारी नोकरी नाकारण्याची शिफारस करणे, असे निर्णय qसग यांनी परिपत्रक काढून घेतले होते. पण, त्यानेही या कायदा न पाळणाèयांवर काहीही फरक पडलेला नाही, हेच पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांवरून दिसते. १९ ऑक्टोबरला qसग यांनी हे परिपत्रक काढल्यापासून २८ ऑक्टोबरपर्यंतच म्हणजे अवघ्या सात दिवसांत मुंबईतील पोलिसांवर हल्ल्याच्या चार घटना घडल्या. दोन दिवसांपूर्वी तर दोन गुंडांची २६/११ च्या हल्ल्यावेळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला पकडण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाèया मंगेश नाईक या पोलिसाला मारहाण करण्यापर्यंत मजल गेली. त्याआधी वसईत एका महिला पोलिस अधिकाèयावर मोबाईल फेकून मारण्यात आला. हे कशाचे लक्षण म्हणावे? मुंबई पोलिसांचा गुंडांना वाटणारा धाक कमी झाला आहे का? विशेष म्हणजे पोलिसांवर हल्ला करणाèयांना अजून कोणतीच कडक शिक्षा होऊ शकलेली नाही. यावरून सत्ताधारीqकवा विरोधी राजकीय पक्षाचे नेते या मुद्यावर गंभीर नसल्याचे स्पष्ट आहे. जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांवर हल्ले वाढत असताना राजकीय पक्षांचे नेते परस्परांवर आरोपांची चिखलफेक करण्यात मशगुल झाले आहेत. गृहमंत्री आर.आर. पाटील हेही गेल्या आठ-दहा दिवसांत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर आरोप करण्यात आणि आपल्या पक्षाच्या कार्यक्रमांतून भाषणे ठोकीत काँग्रेसवर टीका करण्यात मशगूल आहेत. राज्याचे नेतृत्त्व करणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही पोलिसांवरील हल्ले रोखण्याच्या अनुषंगाने कडक भूमिका घेतलेली नाही. ज्यांचे आपण नेतृत्त्व करतो, त्याच जनतेच्ीया समस्यांची, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी हे नेते टाळणार असतील, तर महाराष्ट्राचे भवितव्य सुरक्षित आहे, हे कशावरून म्हणायचे? दुसरे म्हणजे केवळ कायदे करून पोलिसांवरील हल्ले रोखता येणार आहेत का? केवळ कायदा करायचा अन् त्याची अमलबजावणी करताना मात्र पळवाटा शोधायच्या, हेच काम आतापर्यंत सुरू आहे. आता आझाद मैदान परिसरातील qहसाचारावेळी पोलिसांवर हल्ला करणाèयांच्या अटकेचा फेरविचार सुरू असल्याची चर्चा आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी राजकीय पक्ष अशी पाऊले उचलणार असतील, तर पोलिसांवरील हल्ले कमी कसे होणार? हे असेच चालू राहिले तर महाराष्ट्रात पुन्हा गुंडाराज निर्माण होईल, यात शंका नाही.