प्रतिनिधी
औरंगाबाद : इंटरनेटवरून प्रेम जुळलेल्या एका तरुणाच्या शब्दावर विश्वास ठेवून औरंगाबाद शहरातील एका तरुणीने काल रात्री आपले घर सोडले खरे; पण तो तरुण तर आला नाहीच, त्याऐवजी त्या तरुणीला पोलिस आयुक्तालयाची सैर करावी लागली !
यासंबंधी अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील एका तरुणीची इंटरनेटच्या माध्यमातून मुंबईच्या एका तरुणाशी ओळख झाली. दोघांचे चॅqटग वगैरे सुरू झाले आणि त्यातून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमाच्या आणाभाकाही चॅqटगद्वारेच झाल्या. आणि त्या तरुणाने सांगितले की, मी तुला घेण्यासाठी विमानाने येत आहे. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून काल रात्री कुणालाही न सांगता त्या तरुणीने घर सोडले. ती रस्त्यावरून एकटीच चालली होती. ते पाहून काही मुलांनी तिचा पाठलाग सुरू केला. काही मुले आपला पाठलाग करीत आहेत, हे पाहून त्या तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस त्या तरुणीच्या मदतीसाठी तत्परतेने धावले. पण जेव्हा पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा इंटरनेट प्रेमाची माहिती बाहेर आली ! त्यानंतर त्या तरुणीची पोलिस आयुक्त कार्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली.