प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरात सध्या डेंग्यूच्या साथीने थैमान घातलेले असून गेल्या दोन महिन्यांत ८० पेक्षा अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. महानगर पालिकेचे सगळे अधिकारी व पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीतच
दंग असल्यामुळे डेंग्यूच्या साथीवर अद्याप तरी गांभीर्यपूर्वक उपाययोजना सुरू झालेल्या दिसत नाहीत. एकीकडे औरंगाबाद शहराचा विस्तार होत असताना आणि मोठमोठ्या मॉल्सचा झगमगाट सुरू असताना दुसरीकडे शहराला बकाली आलेली आहे. काही अपवाद वगळता बहुतेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत आणि स्वच्छतेच्या नावाने आनंदीआनंद आहे. शहराच्या अनेक भागांत घाण पाण्याची डबकी साचलेली दिसून येतात. त्याम ुळे सिडको, चिकलठाणा, जवाहर कॉलनी, गारखेडा या भागांत डेंग्यूचा फैलाव झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. दुसरे कारण असे की, औरंगाबाद शहराला जेथून पाणीपुरवठा करण्यात येतो त्या पैठण येथील जायकवाडी धरणात पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे सध्या शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. त्यामुळे नागरिकांचा कल पाणी साठवून ठेवण्याकडे आहे. या साठवलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालत असल्यामुळे डेंग्यूचा फैलाव होत आहे, असे वैद्यकीय अधिकाèयांचे म्हणणे आहे. कारण काहीही असो अजून तरी या बाबतीत महानगर पालिकेलाजाग आलेली नाही.