लिटील फ्लॉवर शाळेजवळील घटना, लूटारू रिक्षाचालक पोलिसांच्या जाळ्यात
प्रतिनिधी
औरंगाबाद : अपघात झाल्यानंतर रिक्षाचालकांला समजाविण्यास गेलेल्या महिलेच्या अंगावरील अडीच लाख रूपये qकमतीचे सोन्याचे दागिने, चालक व त्याच्या साथीदारांनी लुटून नेल्याची घटना काल रात्री लिटील फ्लॉवर शाळेजवळ घडली. छावणी पोलिसांनी या प्रकरणी अवघ्या काही तासातच रिक्षा चालकाला अटक केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नदंनवन कॉलनी परिसरातील आशानगर येथे राहणारे निलेश भारत महिरे यांचा भाचा संकेत खापर्डे व त्याचा मित्र रोहन थोरात हे दोघे काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर (एमएच २० सी.जे. ६००५) बसून जात असताना लिटील फ्लॉवर शाळेजवळ अॅपेरिक्षा (एमएच २०-एए ४८६४) बरोबर अपघात झाला. यावेळी रिक्षाचालक अस्लम कुरैशी रशीद कुरैशी व त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी संकेत व रोहनशी हुज्जत घालून दमदाटी करीत होते. यावेळी निलेश महिरे व त्यांची भावजयी कविता हे दोघे त्या ठिकाणाहून कारने जात असताना हा प्रकार पाहिला दोघांनी कारमधून उचलून कुरेशी व त्याच्या साथीदारांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुरैशी व त्याच्या साथीदारांनी निलेश महिरे यांना मारहाण करीत कविता यांच्या गळयातील मंगळसूत्र व कानातील टॉप्स असा अडीच लाखांचा सोन्याचा ऐवज व संकेतच्या खिशातील पाचशे रूपये रोख घेऊन पसार झाले. या प्रकरणी महिरे यांनी छावणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिक्षाचालक अस्लम कुरैशी यास अटक केली आहे. तर त्याचे इतर साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.