प्रतिनिधी
औरंगाबाद : पंचवीस हजार रुपयांची खंडणी न दिल्याने गोळीबार करून खून केल्याच्या आरोपात पप्पु संभाजी गिèहे (रा.पिचडगाव, ता.नेवासा) याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एमटी. जोशी यांनी फेटाळला.
या विषयी माहिती अशी की, फिर्यादी कमलेश लक्ष्मण जगताप यांच्या लॅण्डलाईन फोनवर मुख्य आरोपी सचिन पांडुरंग घोरतळे (२७, रा.नेवासा) याने फोन करून पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र हे पैसे न दिल्याने २४ ऑक्टोबर २०११ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या दुकानासमोर हातात गावठी पिस्तुल घेऊन एकजण आला. त्याने फिर्यादीच्या दिशेने तीन गोळ्या फायर केल्या. यातील गोळी दुकानात बसलेल्या नवाब खान पठाण यांच्या पोटात लागली. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी दाखल
करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नेवासा पोलिसठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी सचिन घोरतळे याला अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पप्पु उर्फ संभाजी गिèहे हा फरार आहे. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून आरोपी पप्पु उर्फ संभाजी याने अटकपूर्व जामीनासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे अॅड.राजेंद्र फाटके पाटील यांनी युक्तीवाद केला की, आरोपी सचिन घोरतळे व सोन्या परदेशी यांनी मध्यप्रदेश येथून चार गावठी पिस्तुल खरेदी करून आणलेले होते. त्यापैकी आरोपी सचिन घोरतळे यांच्याकडून एकच पिस्तुल जप्त करण्यात आलेले आहे. आणखी तीन पिस्तुल जप्त करणे बाकी आहे. त्यापैकी काही पिस्तुल ही फरार आरोपी पप्पु गिèहे, रवी भालेराव यांना दुचाकीवरून पळून जाताना समक्ष पाहणारे सलीम करीम सय्यद हे साक्षीदार आहेत. गुन्ह्यात आणखी दोन आरोपी फरार असून त्यांची माहिती आरोपी पप्पु याला असू शकते. या युक्तीवादानंतर आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला.