प्रतिनिधी
औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवत तरूणीस पळवून प्रियकराने तिचे अश्लील फ़ोटो काढून ब्लॅकमेलींग केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान लग्नास स्पष्ट नकार दिल्याने सदरील तरूणीने विष घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना नांदर (ता.पैठण) येथे घडली.
पाचोड पोलिसांनी घटनेतील आरोपीला अटक केली असून नितेश वसंत हिवराळे (२२, रा.कांचनवाडी) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. मागील काही दिवसापासून नितेश याचे नांदर येथील एका तरूणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. तिचा विश्वास संपादन करीत त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत दोन महिन्यापूर्वी पळवून औरंगाबादला आणले. काही दिवस ते एकत्र राहिले. याच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याने नितेशने तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेqलग सुरू केली. बदनामीची भिती दाखवत नितेशने तिच्यासोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. आपली ‘सवणूक झाल्याचे लक्षात येताच सदरील तरुणी त्याची साथ सोडून आपल्या घरी परतली. मात्र, बदनामीच्या भितीने तीने शेवटी शनिवारी सकाळी विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविली. सोमवारी सायंकाळी शोभाबाई दिनकर झिने (४०) यांनी पाचोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नितेश वसंत हिवराळे याच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री पाचोड पोलिसांनी आरोपीस अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक
द्वारकादास चिखलीकर तपास करीत आहेत.