प्रतिनिधी
औरंगाबाद : सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत्यूपूर्व जबानीवरून सासरच्या पाच जणांविरूद्ध वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेवराई सेमी (ता.सिल्लोड) येथे रविवारी सायंकाळी घडली होती. रूख्मणबाई शिवाजी ताठे (३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सतत होणाèया सासरच्या शारिरीक, मानसिक त्रासाला कंटाळून रूख्मणबाईने जाळून घेतले. सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेत तिचा पती शिवाजी ताठे (३५) हा देखील भाजला. या प्रकरणी वडोदबाजार पोलिसांनी तिच्या मृत्यूपूर्व जबानीवरून पती शिवाजी बाबूराव ताठे, सासरा बाबूराव भिवसन ताठे, सासू कमलबाई बाबूराव ताठे, दीर सुधाकर व जाqलदर ताठे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सोमनाथ पवार करीत आहेत.