चीनमध्ये एका कलाकाराला सार्वजनिक ठिकाणी सेक्स करण्याच्या आरोपाखाली १२ महिन्यांचा कारावास सुनावण्यात आला आहे. नाटक सुरू आहे, असे सांगून त्याने सर्व लोकांसमोरच प्रेयसीसोबत सेक्स करायला सुरुवात केली होती, पण त्याचे सेक्सचे नाटक लोकांना आवडले नाही आणि त्यांनी कलाकाराला प्रेयसीसह पोलिसांच्या ताब्यात दिले. बीqजगच्या एका आर्ट गॅलरीत हा प्रकार घडला होता. ५७ वर्षीय चेंग ली आपल्या प्रेयसीसह स्टेजवर आला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी आर्ट गॅलरीत दोनशेहून अधिक नागरिक होते. यात महिलांचीही संख्या मोठी होती. चेंगने सर्वांना आता आर्ट व्होर (वेश्येची कला) हा नाटकप्रकार बघायला मिळेल, असे सांगितले. काहीतरी गंमतीदार नाटक असेल म्हणून लोकांनीही टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन दिले. पण नंतर स्टेजवर जे घडत गेले ते पाहून सर्वांच्या माना खाली जाऊ लागल्या. महिलांनीही तर तिथून निघून जाणेच योग्य समजले. आंबटशौकिन स्टेजवरच्या रासलीला मजेने पाहत असताना, दुसरीकडे काही सभ्य मंडळींचा संताप अनावर झाला. त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस आले तेव्हा नाटक संपायलाच आले होते. पोलिसांनी मध्येच नाटक थांबवले. चेंग व त्याच्या प्रेयसीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चेंगला १२ महिन्यांची शिक्षा केली. त्याच्या प्रेयसीला मात्र सोडून देण्यात आले. मात्र एवढे घडूनही चेंगने आपल्या नाटकाचे समर्थनच केले आहे. तो पत्रकारांशी बोलताना म्हणाला, की बदलत्या काळात कलेचे बाजारीकरण झाले असून, सेक्सच्या व्यापारासारखेच त्याला स्वरूप आले आहे. हे चित्र बदलण्याची गरज असल्यानेच आपण हे नाटक रचले होते, पण लोकांनी त्यात अश्लीलता बघून माझ्या नाटकाचा अपमान केला आहे, असे तो म्हणाला. चेंग मानसिक आजारी आहे, असा निष्कर्ष त्याच्या वक्तव्यावरून प्रसारमाध्यमांनी काढला आहे.