टॉपलेस होऊन कॉफी देणाèया युवतींचे वेसलबोरो शहरातील कॉफी शॉप बंद झाले असून, प्रशासनाने त्याला कुलूप ठोकले आहे. २००९ साली हे शॉप सुरू झाले तेव्हा अवघ्या अमेरिकेत चर्चेचे ठरले होते. लोक केवळ टॉपलेस युवती पाहण्यासाठी या शॉपमध्ये गर्दी करत होते. या कॉफी शॉपला प्रचंड विरोधही झाला होता. पण हळूहळू विरोध कमी होत गेला आणि शॉप चांगले चालू लागले होते. पण अचानक एका बोर्डने शॉपला अडचणीत आणले. काही दिवसांपूर्वी शॉपच्या मालकाने शॉपबाहेर बुबीज वांटेड (मोठ्या ब्रेस्टवाल्या महिलांची गरज आहे.) असे बोर्ड लावले होते. बोर्डवर अनेकांनी हरकत घेतल्याने प्रशासकीय अधिकाèयांनी तातडीने शॉपला कुलूप ठोकण्याचा आदेश दिला. प्रचंड विरोध असूनही तब्बल दोन वर्षे ही शॉप चालत आली होती. गेल्या दोन वर्षांत सर्व गुपचूप चालत होते म्हणून प्रशासनाने गांभीर्याने घेतले नव्हते. पण आता थेट बोर्डच दुकानाबाहेर लावल्याने प्रशासनाला कारवाई करावी लागली. प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात शॉपचा मालक डोनाल्ड कॅबट्री न्यायालयात जाईल, असे वाटले होते. पण दोन वर्षे त्यांनी इतक्या विरोधाला तोंड दिले आहे की आता त्याच्यात विरोध करण्याची क्षमताही राहिलेली नाही. पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, की लोकांना आनंदी पाहण्यासाठी आणि दोन क्षण विरंगुळ्याचे मिळावे म्हणून मी या अनोख्या कॉफी शॉपची सुरुवात केली होती. पण त्यामुळे इतका संघर्ष करावा लागला की आता संघर्ष करण्याची qहमत मी हरवून बसलो आहे, असे तो म्हणाला.
