कुणालाच विश्वास वाटणार नाही, अशी घटना अमेरिकेच्या एरिझोना शहरात उघडकीस आली असून, एका ४९ वर्षीय महिलेवर अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. विशेष म्हणजे तिची १८ वर्षीय मुलगीही याच मुलासोबत शरीरसंबंध ठेवून होती. ही बाब महिलेच्या पतीला कळल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलासोबत महिलेला रंगेहात पकडले. सुजेन ब्रुक असे या महिलेचे नाव आहे. तिने या मुलासोबत तेव्हापासून संबंध बनवले होते जेव्हा तो अवघ्या १३ वर्षांचा होता. संबंध कसे ठेवतात हेही तिनेच त्याला शिकवले होते. नंतरच्या काळात सुजेनच्या १८ वर्षीय मुलीनेही या मुलासोबत संबंध प्रस्थापित केले. सुजेनच्या पतीच्या मित्राचा हा मुलगा होता. त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. सुजेनच्या पतीला जेव्हा आपल्या बायकोचे एका अल्पवयीन मुलासोबत संबंध असल्याचे कळले तेव्हा त्याने बायकोला धडा शिकवण्यासाठी थेट पोलिसांचीच मदत घेतली. अमेरिकेत अल्पवयीन मुला, मुलीसोबत मर्जीने qकवा मर्जीशिवाय संबंध ठेवणे गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून सुजेनला मुलासोबत रंगेहात पकडले. जेव्हा सुजेनच्या मुलीला कळले की ती ज्या मुलासोबत संबंध ठेवून आहे, त्याचे आपल्या आईसोबतही संबंध होते, तेव्हा तिला धक्काच बसला. तिने स्वतःच्या संबंधाची माहिती पोलिसांना दिली. सुजेनच्या पतीने पत्रकारांशी बोलताना सांगितले, की सुजेनने मला धोका दिला असून, ती अशी वागेल, याची कल्पनाही मी केली नव्हती. यामुळे मला मोठा मानसिक धक्का बसला आहे, असे त्याने सांगितले.