कोणतीही गोष्ट पूर्णपणे समर्पित होऊन केली तर अपेक्षेपेक्षा चांगले फळ मिळते, असे आतापर्यंत तज्ज्ञांनी म्हटले आहे. याचाच विचार करून स्पेनमधील एका जिम मालकाने आपल्या जिममध्ये येणाèया सर्व ग्राहकांना नग्न होऊन व्यायाम करण्याची अट घातली असून, व्यायाम करताना समर्पित भावना निर्माण व्हावी, हा उद्देश यामागे असल्याचे तो सांगत आहे.गेल्या काही महिन्यांपासून या जिममध्ये सर्व जण नग्न होऊन व्यायाम करताना दिसतात. सर्वच जण नग्न असल्याने एकमेकांना लाजण्याचा प्रश्नच उरत नाही. महिला आणि पुरूष दोन्हीसाठी हा जिम आहे. एकाच हॉलमध्ये सर्वांच्या कसरती चालतात. सुरुवातीला जेव्हा जिम मालकाने आपली कल्पना ग्राहकांना ऐकवली तेव्हा ८० टक्के ग्राहकांनी यानंतर जिममध्ये पाऊल ठेवणार नाही, असे बजावले. पण तरीही जिम मालक मॅर्क लॅसेका याने आपला नियम जिममध्ये लागू केला. त्यामुळे त्याला काही काळ नुकसान सोसावे लागले. पण हे काहीच महिने. त्यानंतर हळूहळू लोक कुतूहलाने जिममध्ये येऊ लागले. यात महिलांचीही संख्या आश्चर्यस्पद होती. आता पुन्हा एकदा जिम ग्राहकांनी फुलून गेला आहे. जिम मालक मॅर्क म्हणाला, की व्यायाम करण्यास अनेक टाळाटाळ करतात. अशा लोकांमध्ये रूची निर्माण करण्यासाठा माझा उपाय कामी आला आहे. सुरुवातीला लाजत लाजत कपडे उतरवणारी मंडळी आता मनात कोणत्याही भावना न आणता व्यायाम करताना दिसते, असे तो म्हणाला.