स्नेहा पारवार
औरंगाबाद : काळ म्हणजे वेळ आणि काळ म्हणजेच मृत्यू... आतापर्यंत आपण यातील पहिल्या काळाची म्हणजे वेळेची गरज म्हणून मोबाईलला मान्यता दिली होती, पण औरंगाबादच्या एका तज्ज्ञ डॉक्टरांनी दुसèया काळाची म्हणजे मृत्यूचीही गरज मोबाईलच असल्याचे जाहीर केले आहे. मोबाईल फोनच्या अतिवापराने ब्रेन कॅन्सर होतो, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. जर मोबाईल काळाची (मृत्यूची) गरज होऊ द्यायचा नसेल तर हॅन्ड फ्री किंवा मॅसेजसारख्या सुविधांचा वापर जास्तीत जास्त करा, असा सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत. मुंबईहून एका खासगी कामानिमित्त आलेल्या डॉ. राजेंद्र देशमुख यांनी मीडिया प्लसचे कार्यकारी संचालक मनोज सांगळे यांच्याशी असलेल्या स्नेहापोटी मीडिया प्लसच्या कार्यालयाला भेट दिली. या वेळी झालेल्या चर्चेतून डॉ. देशमुख यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती औरंगाबाद न्यूज लाइव्हशी बोलताना दिली. त्यांनी सांगितले, की मोबाईलच्या वापरातून निर्माण होणाèया विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. इपीडिमीयोलॉजिकल संशोधनातून आम्ही या निष्कर्षाप्रत पोहचलो आहोत. सध्या मोठ्या प्रमाणावर मेंदूत होणाèया ग्लिओमा कॅन्सरची प्रकरणे वाढली आहेत. यातील बहुतांश रूग्ण दगावले आहेत. रूग्णांपैकी ९९ टक्के रूग्ण मोबाईल फोनचा अतिवापर करायचे. काही लोकांनी दहा वर्षांच्या कालावधीत प्रतिदिवस कमीतकमी ३० मिनिटे आपल्या मोबाईल फोनचा वापर केला होता. संपूर्ण जगात सुमारे ५ अरब मोबाईल फोन नोंदणीकृत आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. लोक मोबाईलवरच जास्तीत जास्त संवाद साधत असल्याने त्यांचा मृत्यूकडे प्रवास वेगाने सुरू आहे. ब्रेन कॅन्सरचा संबंध सध्याचे वैज्ञानिक वायरलेस उपकरणांशी जोडतात. पण त्याची पुष्टी ते करू शकले नव्हते. तूर्त संशोधनात ग्अिओमा आणि एकॉस्टिक न्यूरोमा म्हटल्या जाणाèया मेलिग्नेट ट्यूमर वाढण्याचे कारण मोबाईल निष्पन्न झाले आहे, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.