कुटुंबाने एकत्र बसून पाहावा, असे चित्रपट तयार होणेच सध्या बंद झाले आहे. कोणताही चित्रपट पहायचा म्हटलं की त्यात अश्लीलता खच्चून भरलेली असते. या परिस्थितीत मनोरंजनाचे साधन म्हणून साहाजिकच टीव्हीकडून जास्त अपेक्षा वाढतात. पण टीव्हीही कमी नाही. त्यावर प्रदर्शित होणारे कार्यक्रम इतके पुढे गेले आहेत, की टीव्ही चालू करायचा म्हटलं तरी पालकांच्या मनात धडकी भरते. सगळं कसं अतिरेकी. एमटीव्ही या वृत्त वाहिनीवरील एका कार्यक्रमाचे तर सर्व मर्यादा, नैतिकतेचे बंधन धाब्यावर ठेवले. या टीव्हीवरच्या जिओडी या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाèया कलाकारांनी जे केलं ते नुसतं ऐकून आपले कान गरम होतील... या कार्यक्रमातील सर्व कलाकार प्रचंड मस्ती करताना दिसत असतात. मस्ती करताना त्यांना हेही कळत नाही की ते टीव्हीवर आहेत. त्या दिवशी कलाकारांनी सर्व सीमा पार केल्या. कलाकारांपैकी एका महिला मस्तीत एवढी दंग झाली की, तिने चक्क आपले अंतर्वस्त्र (ब्रा) उतरवून टाकले. या वेळी सर्वच कलाकारांनी मद्यप्राशन केले होते. महिलेने अंतर्वस्त्र काढल्यानंतर पुरुष कलाकारांनी तिच्यावर दारू उडविण्यास सुरुवात केली. हा कार्यक्रम सुमारे तीन लाख तीस हजार प्रेक्षकांनी पाहिला. प्रेक्षकांनी टीव्हीवर असे काही दिसेल, याची अपेक्षाही नव्हती. हा कार्यक्रम तसा लोकप्रिय आहे, पण इतकी अश्लीलता गाठली जाईल, असे कुणालाही वाटले नव्हते. त्यामुळे साहाजिकच कलाकारांच्या वर्तनाप्रती संतापाची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. अनेक प्रेक्षकांनी टीव्ही वाहिनीकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणीही सेव्ह लाईफ या सामाजिक संघटनेने केली आहे.