कलेवर प्रेम असावे. पण ते किती असावे, याला काही मर्यादा आहेत. अमेरिकेच्या एका महिलेने आपल्या छायाचित्रणाच्या वेडापायी चक्क रस्त्यावर नग्न फिरून फोटोसेशन केले. ती अशी फिरत असताना लोक आश्चर्यचकीत होऊन तिच्याकडे पाहत होते. महिलांनी तर आपल्या माना दुसरीकडे वळवणेच योग्य समजले होते. पेरिजियन एरिका असे या २५ वर्षीय फोटोग्राफरचे नाव आहे. अन्य कुणाची छायाचित्रे काढण्याऐवजी स्वतःचीच छायाचित्रे काढली तर, असा विचार तिच्या मनात आला आणि तिने स्वतःच नग्न होऊन शहरात फिरायला सुरुवात केली होती. विना कपडे फिरत असताना पोलिसांनी तिला अटक केली नाही हे विशेष. ट्रेन, लायब्ररीतही तिने फोटोसेशन केले. या अनोख्या फोटोसेशनबाबत पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली, की सुरुवातीला मला भीती वाटली होती. पण मनात आलेली गोष्ट पूर्ण करण्याचाच ध्यास मी घेतला होता. त्यामुळे लोकांची पर्वा केली नाही. तरीही लोकांचा कोणताही वाईट अनुभव मला आला नाही, हे त्यातल्या त्यात बरे झाले, असेही एरिका म्हणाली. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी याबाबत पोलिसांना विचारले असता, पोलिसांनी कोणतीही तक्रार न आल्याने कारवाई केली नाही, असे सांगितले.