मोबाईल बनला डोकदुखी!
स्नेहा पारवार
औरंगाबाद : शहरातील शेकडो मुलींसाठी मोबाईल डोकेदुखी बनला असून, मोबाईलवर येणारे अननोल कॉल आणि मॅसेजेसमुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कुठून तरी मोबाईल नंबर लीक झाल्याने त्यांना अनोळखी व्यक्तींचे कॉल यायला सुरुवात होते आणि त्यानंतर सातत्याने समजावून सांगूनही कॉल येणे सुरूच राहतात. तुझे नाव काय, कोठे राहतेस असे प्रश्न विचारून, मुलीला वैतागून सोडले जाते. पोलिसांनी अशा प्रकरणांत पुढाकार घेऊन, मुलींच्या मदतीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
चित्रपटात लव्ह आणि सेक्सच्या बाबत गैरसमज वाढविणारे प्रसंग, टीव्हीवरील मालिका यामुळे कॉलेजच्या युवकांमध्ये अशा प्रकारे गैरवर्तन येऊ लागले आहेत. त्यांना हेही कळेनासे झाले आहे, की आपण जे करत आहोत ते चुकीचे आहे आणि त्यामुळे समोरच्या मुलीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे लागत आहे. काही टवाळखोर मंडळी तर टॉकटाईमचे कार्ड टाकून प्रत्येक नंबरला कॉल करत राहतात. शंभर कॉल केले तरी त्यातील २० ते २५ नंबर मुलींचे असतात. मग या मुलींना सातत्याने फोन करून, त्रास देणे सुरू होते. हॅलो मला या नंबरवरून मॅसेज आले, कॉल आला असे सांगून मोबाईलवर बोलणे सुरू होते. मुलींनी कितीही नाही म्हटले तरी, समोरचा व्यक्ती आपल्याच बोलण्यावर ठाम असतो आणि तुम्ही कोण, कुठल्या अशी विचारणा सुरू होते. त्यानंतर कितीही सांगितले तरी तिच वारंवार फोन करून त्रास देते. मुली अनेकदा घरी सांगायला कचरतात. पण अतिरेक झाल्यानंतर घरी सांगण्याशिवाय त्यांच्याकडेही पर्याय नसतो. घरी सांगितल्यानंतर मुलींच्या घरचे संबंधित नंबरवर कॉल करतात. तेव्हा समोरचे व्यक्ती शिविगाळ करायलाही मागे पुढे पाहत नाहीत qकवा धमक्या देणे सुरू असतात. असा हा भयंकर प्रकार घडत असतो. शहरातील अशा स्वरूपाच्या दोन -तीन घटना घडत असतात, असे औरंगाबाद न्यूज लाइव्हच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

मुलींनी काय करावे?
*मोबाईल ही आपली पर्सनल बाब आहे आणि ती केवळ घरच्यांशी आपण कायम संपर्कात राहण्यासाठीच आपल्याला घेऊन दिली आहे, ही बाब आधी मुलींनी लक्षात घेणे गरजेचे आहे
* मोबाईलमध्ये सर्व जवळच्या व्यक्तींचे नंबर सेव्ह करून घ्यावेत. कोणताही कॉल आल्यानंतर कुणाचा कॉल आहे, हे स्क्रिनवर झळकेलच. जर अननोल कॉल असेल तर अजिबात उचलू नये. एवढे केले तरी संभाव्य कोणताही धोका उद्भवत नाही.
* आपला नंबर केवळ अगदी जवळच्या नातेवाईकांनाच दिला गेला पाहिजेत.
* अगदी मैत्रिणींनाही घरचा, भावाचा qकवा वडिलांचा नंबर द्यावा. कारण नंबर लीक होण्याचे सर्वाधिक प्रमाण मैत्रिणींकडूनच घडत असल्याचे दिसून आले आहे.
* कॉलेजमध्ये कोणत्याही अर्जावर घरचा qकवा वडिलांचाच नंबर टाकावा.
* सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यातल्या त्यात फेसबुक आणि ऑर्कूट बघणाèयांची संख्याही भरपूर झाली आहे. सोशल नेटवर्किंग खात्यावर, कोणत्याही वेबसाईटवर माहिती देताना स्वतःचा मोबाईल नंबर टाकू नये..