वाचनाची सर्वांगिण भूक झेप भागवणार : सांगळे
प्रतिनिधी
औरंगाबाद : वाचनाची सर्वांगिण भूक भागवण्यासाठी मीडिया प्लसच्या सहकार्याने झेप या साप्ताहिकाची सुरुवात करण्यात आली असून, हे साप्ताहिक अल्पावधीत लोकप्रिय होईल यात संशय नाही, असे प्रतिपादन मीडिया प्लसचे कार्यकारी संचालक मनोज सांगळे यांनी केले.
झेपचा प्रकाशन सोहळा मीडिया प्लसच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी श्री. सांगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झेपचे मुख्य संपादक डी. एन. जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरुण चव्हाण, मीडिया प्लसचे सल्लागार संचालक भगवान साळवे उपस्थित होते. या वेळी झेपचे मुख्य संपादक डी. एन. जाधव यांनी झेप विषयी माहिती दिली. सर्व वयोगटातील वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून झेपचा अंक तयार करण्यात येणार आहे. एक चांगला दर्जेदार अंक वाचकांच्या हाती देताना आम्हा अत्यानंद होत आहे. झेप एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात पोहचेल अशी व्यवस्था करण्यात आली असून, सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख वितरकांकडे झेप उपलब्ध असेल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.