औरंगाबाद न्यूज लाइव्हचे थाटात लोकार्पण
प्रतिनिधी
औरंगाबाद : सध्याचे युग हे तंत्रज्ञानावर आधारित आहे. बदलत्या युगाच्या वाटा ओळखून मीडिया प्लसने सुरू केलेली औरंगाबाद न्यूज लाइव्ह ही न्यूज वेबसाईट भविष्यात निश्चितच सर्वांच्या पसंतीस उतरेल. या वेबसाईटच्या माध्यमातून रोजच्या ताज्या बातम्या देण्याबरोबरच सामान्यांच्या समस्याही सोडविण्यात मदतच होईल, असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या सौ. वैशालीताई डोळस यांनी केले.
मीडिया प्लस वृत्त-फिचर्स संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या औरंगाबाद न्यूज लाइव्ह या औरंगाबादच्या पहिल्या न्यूज वेबसाईटचे लोकार्पण सौ. वैशालीताई डोळस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय गवळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून टॅक्स कन्सल्टंट जे. एस. कदम उपस्थित होते. या वेळी बोलताना वैशालीताई म्हणाल्या, की ऑनलाईन वृत्तपत्रे वाचण्याचा नवीन पायंडा या नव्या तंत्रज्ञान युगात पडत चालला आहे. पाश्चात्त्य देशांत अनेक मोठमोठ्या वृत्तपत्रांनी स्वतःची कागदी वृत्तपत्रे बंद करून, ऑनलाईन वृत्तपत्रे सुरू केली आहेत. पूर्वी अशी भीती व्यक्त केली जायची, वृत्तवाहिन्यांमुळे लोकं वृत्तपत्रे वाचणे सोडतील, पण न्यूज वाचण्यात जी मजा आहे, ती बघण्यात कधीच नसते. त्यामुळे वृत्तपत्रे अजूनही चालत आहेत आणि त्यांच्या वाचकसंख्येत कायम भरच पडत गेली आहे. ऑनलाईन न्यूज वेबसाईटमुळे मात्र वाचनाची भूक भागण्याबरोबरच कागदाचे वृत्तपत्र सोबत ठेवण्याची कटकट संपणार आहे. त्यामुळे भविष्यात वृत्तपत्रांपुढे ऑनलाईन न्यूज वेबसाईट हे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मीडिया प्लसने काळाची पावले योग्य वेळी ओळखली यातच त्यांचे यश दडले आहे, असेही सौ. वैशालीताई म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कॉम्प्युटर्सचे संचालक तथा मीडिया प्लसचे तंत्र सल्लागार विजय वाघमारे पाटील यांनी केले. प्रास्ताविक मीडिया प्लसचे कार्यकारी संचालक मनोज सांगळे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी मीडिया प्लसच्या जडणघडणीची माहिती सांगून, औरंगाबाद न्यूज लाइव्हची संभाव्य वाटचाल स्पष्ट केली. कार्यक्रमाला पुण्यनगरीचे सहायक संपादक अरुण चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार आणि मीडिया प्लसचे सल्लागार संचालक भगवान साळवे, मीडिया प्लसचे सल्लागार संचालक डी. एन. जाधव, बबन नरवडे, पत्रकार संदीप दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते विलास पगार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाला निमंत्रित मोठ्या संख्येने आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीडिया प्लस आणि विजय कॉम्प्युटर्सच्या कर्मचाèयांनी परिश्रम घेतले.