सुशिलकुमार शिंदे म्हणजे चतुरस्त्र राजकारणी. त्यांना सामान्यांच्या भावनांची जाण आहे, त्या सोडविण्याचा कळवळा आहे इतकेच काय पण सामान्यांच्या समस्यांविषयी लढण्याचीही त्यांची तयारी आहे. विरोधकांना नामोहरम करण्याची शक्तीही त्यांच्याकडे आहे. वय झाले म्हणून शस्त्र त्यांनी अजून टाकलेले नाही. इतर वय झालेल्या नेत्यांपेक्षा कितीतरी पटीने राजकारणात ते सक्रीय आहेत. सुशिलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले असल्याने त्यांच्या निर्णयक्षमतेची जाणीवही अवघ्या महाराष्ट्राला आहे. पण एवढ्या सर्व चांगल्या नावलौकिकाला काळीमा फासण्याचे काम स्वतः त्यांनी करावे, याचे रविवारी सर्वांनाच आश्चर्य वाटले. आपल्याला मिळणाèया पदांमुळे qशदे यांनी इतके हुरळून जाऊन जनतेला चक्क मूर्खात काढण्याचे केलेले कृत्य त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे कविवर्य नारायण सूर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना बोलाविण्यात आले होते. या सोहळ्यानंतर काही पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जी मल्लिनाथी केली, ती एखाद्या पोरकट राजकारण्याने करावी अशी होती. सुशिलकुमार शिंदे म्हणाले, कोळसा कितीही उगाळला तरी काळाच असतो. हात धुतला की स्वच्छ होतो. ज्या प्रमाणे लोक बोर्फोस विसरले, एनडीएच्या काळातील पेट्रोलपंप वाटपाचे प्रकरण लोकांच्या विस्मृतीत गेले, त्याप्रमाणे कोळसा प्रकरणही विसरतील. आता केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर सुशिलकुमार qशदे यांचे विचार इतक्या खालच्या पातळीवर येतील, असा विचारही कुणी करू शकतं का? त्यांनी असे वक्तव्य करून एकप्रकारे जनतेची अक्कलच काढली आहे. आधीच महागाईमुळे जनतेचा सरकारवरचा रोष प्रचंड वाढला आहे. अशा परिस्थितीत जनतेला धीर देण्याचे आणि महागाईतून सावरण्याचे काम करण्याची गरज असताना, असली वक्तव्ये करून सुशिलकुमार शिंदे यांच्यासारखे नेते काय साध्य करत आहेत हेच कळत नाही. एकीकडे नेत्यांनी घोटाळ्यांवर घोटाळे करायचे आणि देशाला होणारे नुकसान टाळण्यासाठी जनतेच्या मानगुटीवर बसायचे आणि वरून पुन्हा जनतेला काय अक्कल आहे, असे म्हणून त्यांची अक्कलही काढायची. यामुळे सत्तेचे दिवस कमी होताहेत, हे शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना लक्षात घेतले पाहिजेत. दिग्विजय qसगसारखे तोंडाळ नेते सध्या जनतेच्या संयमाचीच परीक्षा घेत आहेत. मनमोहन qसग मौनी बाबा बनून सामान्यांचा संयम अनावर करत आहेत. अशात सुशिलकुमार शिंदे यांच्यासारख्या पांढरपेशा नेत्याने स्वतःप्रती संताप ओढावून घेणे चांगले नाही. महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर कोणताही असा सामान्यांना जवळचा वाटेल असा नेता नाही, अशात सुशिलकुमार शिंदे यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सामान्यांच्या हितासाठी निश्चितच काहीतरी पावले उचलायला हवीत. त्याऐवजी असे फटकळ वक्तव्ये करून, सरकारच्या पापाचे भागीदार त्यांनी होऊ नये, एवढेच सांगावेसे वाटते.
सुशिलकुमार शिंदेंची मल्लिनाथी
Written By Aurangabadlive on बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१२ | १:५८ AM