प्रतिनिधी
औरंगाबाद : शासकीय रुग्णालयात आता माता व शिशुंना मोफत उपचार मिळणार असून, जननी सुरक्षा योजने अंतर्गत औषधी व रक्त किंवा सोनोग्राफी आदी तपासण्यासाठीही त्यांना पैसे मोजावे लागणार नाहीत. याबाबतचा आदेश नुकताच प्राप्त झाला आहे.
खाजगी रुग्णालयापेक्षा शासकीय रुग्णालयात होणाèया प्रसूतीची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. त्यात सुलभ प्रसूतीवरच या ठिकाणी अधिक भर देण्यात येत असल्यामुळे जिल्ह्याबाहेरील रुग्णही या ठिकाणी येतात. यापूर्वी प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णाला सोनोग्राफी, रक्त किंवा इतर तपासण्या मिळून जवळपास ४५० ते ८०० रुपयापर्यंतचा खर्च येत होता. त्यामध्ये प्रसूती, सिझरसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येत होते. परंतु आता जननी सुरक्षा योजनेअंतर्गत रुग्णालयात येणाèया मातांची प्रसूती मोफत करण्यात येणार आहे. त्याचा फायदा गरीब रुग्णांना मिळणार आहे. यापूर्वी फक्त पहिल्या प्रसूतीसाठी पैसे आकारले जात नव्हते.आता मात्र सर्वच प्रसूतीसाठी एक रुपयाही रुग्णांना मोजावा लागणार नाही. त्याचबरोबर जन्मलेल्या शिशुवर बालगृहात नि:शुल्क उपचार केले जाणार आहेत. त्याच्या सर्व तपासण्याही विनाशुल्क करण्यात येणार आहेत. याबाबत नुकताच रुग्णालयाला आदेश प्राप्त झाला आहे.