प्रतिनिधी
औरंगाबाद : घरचे प्रकरण दारात गेले की, काय होते, याचे प्रत्यंतर एका निवृत्त शिक्षकाच्या घरगुती प्रकरणावरून सर्वांच्या लक्षात येईल. अशा परिस्थितीत जो तो आपल्या परीने फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असतात, अशा वेळी समजुतदारीने आणि शहाणपणाने निर्णय घेणेच योग्य ठरते... या शिक्षकाच्या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केला म्हणून ठीक, अन्यथा ऐन म्हातारपणात शिक्षक आणि त्यांच्या पत्नीला स्वतःचे घर जाऊन भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली असती....
औरंगपुèयातील रहिवासी निवृत्त शिक्षकाने २० वर्षांपूर्वी पेट्रोल पंपासमोरील म्हाडा कॉलनीत घर घेतले होते. चार मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार... दोन मुलांनी त्यांचा स्वतंत्र संसार थाटलेला... शिक्षकाची पत्नी म्हाडा कॉलनीच्या घरात एकटीच राहायची. कित्येक दिवसांपासून शिक्षक आणि त्यांची पत्नी विभक्त झालेले होते. मुले स्वत:चे घर असतानाही आईच्या अडेल स्वभावामुळे भाड्याच्या घरात राहत होती. घरी आलेल्या मुलांना आणि पतीला पत्नी घराबाहेर काढायची. त्यामुळे साहाजिकच अनेकांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले गेले. अनेकांच्या डोळ्यांत ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेले ते घर सलू लागले. त्यांनी घर विक्री करावे, म्हणून शिक्षक पत्नीकडे आग्रह धरला. त्यातून कसा फायदा होईल हेही समजावून सांगणे सुरू केले. ही बाब जेव्हा शिक्षकाला कळली तेव्हा त्यांनी पत्नीने असे काही करू नये, म्हणून समजावून सांगण्यास सुरुवात केली. पण पत्नी ऐकत नसल्याचे पाहून त्यांनी पोलिसांत धाव घेतली व घर विक्रीपासून रोखावे, अशी विनंती केली. या प्रकरणात एका वकिलानेही हात ओले करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्व प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर सर्वांना ठाण्यात एकत्र केले. सर्वांना समजावून सांगितले. त्यामुळे पोलिसांचे म्हणणे सर्वांना पटले. पण आपल्या आतापर्यंतच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते की काय म्हणून वकील महाशय qचतीत झाले. त्यांनी पुन्हा सर्वांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना त्यांच्या भाषेत समज दिल्यावर त्यांनी काढता पाय घेतला. आता सामोपचाराने हा वाद मिटल्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले. कोणताही गुन्हा, कुणावरही दाखल न करता, अगदी संयमाने हे प्रकरण हाताळणे आणि त्यासाठी खास करून वेळ देणे, याबद्दल पोलिसांचे अभिनंदनच करायला हवे!