भलेही एखाद्या जोडप्यात विचारांचा फारसा फरक नसेल. पण रंगाच्या बाबतीत मात्र कोणत्याच जोडप्याची मते जुळलेली आढळत नाहीत. मुलांना निळा रंग आवडतो तर मुलींना गुलाबी. असे का आहे, याचे कारण शास्त्रज्ञांनी शोधून काढले असून, त्यांनी मेंदूतील संरचना याला कारणीभूत ठरवल्या आहेत.
झियांग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले, की मुलींच्या मेंदूतील संरचनेमुळे त्या पिकलेल्या फळांसारख्या रंगाकडे आकर्षित होतात तर मुलांना आकाशासारखे रंग पसंत असतात. ३५० हून अधिक विद्याथ्र्यांवर हे संशोधन करण्यात आले. त्यात त्यांच्यासमोर ११ वेगवेगळे रंग ठेवून त्यांची पसंती विचारण्यात आली. सोबतच सर्वांच्या व्यक्तीमत्त्वाचे परीक्षणही करण्यात आले. या संशोधनात दिसून आले की, मुलींनी गुलाबी, पांढरा अशा रंगांना पसंती दिली तर मुलांनी निळा, हिरवा असे रंग पसंत केले. संशोधनात हेही समोर आले की अंतर्मुखी मुले पिवळ्या रंगाला पसंत करतात तर विक्षिप्त मुली ग्रे रंगाची निवड करतात.