प्रतिनिधी
औरंगाबाद : येत्या २२ ऑक्टोबरपासून महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज वितरण व स्वीकृती प्रक्रियेला प्रारंभ होणार असून, महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक २९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. नगरसचिव तथा उपायुक्त रqवद्र निकम यांनी ही माहिती दिली.
पुढील अडीच वर्षाच्या काळासाठी महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. २५ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज वितरित केले जातील. २२ ते २५ दरम्यानच अर्ज स्वीकृती होणार आहे. २९ ऑक्टोबरला सकाळी ११ पासून निवडणुकीला प्रारंभ होणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी कुणाल कुमार पीठासन अधिकारी असतील.