ज्याला सोपविले सर्वस्व, त्यानेच दिल्या नरकयातना!
स्नेहा पारवार
औरंगाबाद : दोघांनी प्रेम केलं... एकमेकांवर जीव ओवाळून टाकला... सोबत जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतल्या आणि घरचा विरोध पत्करून २२ डिसेंबर २०११ रोजी साताजन्माचे साथी झाले... पण बहुधा नियतीच्या मनात काही वेगळाच डाव होता. लग्न झाल्याने ती सासरी आली. दुसèया जातीची असली तरी, एलएलबीला शिकतेय म्हणून सासरच्यांनीही अॅडजस्ट करून घेतलं. अर्थात ही अॅडजेस्टमेंट काहीच दिवस टिकली... नंतर सुरू झाला, तो असहाय छळ... लव्ह यू लव्ह यू म्हणून जो थकत नव्हता, तोच प्रियकर नवरा झाल्यानंतर प्रेम विसरला होता. लग्नाच्या सहा महिन्यानंतरच प्रियकराचे खरे रूप समोर आल्याने ती हताश झाली होती. सासू- सासèयांचे दुसèया जातीची म्हणून हिणवणे सुरू झाले. मात्र तरीही उद्याचा दिवस तरी आशेचा किरण घेऊन येईल आणि आपला संसार पुन्हा प्रेमाने भरभरून वाहील, अशी अपेक्षा ती बाळगून होती. पण कदाचित तो दिवस तिच्यासाठी कधी उगवलाच नाही. आता आपल्यासाठी जगात काहीच उरले नाही, याची जाणीव तिला तेव्हा झाली, जेव्हा हृदयाचा तुकडा म्हणून काळजी घेणारा प्रियकर एकेरात्री अक्षरशः तिला बेदम मारहाण करत सुटला... त्यानंतर मात्र तिने संयम सोडला आणि सरळ पुन्हा आई- वडिलांच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. मुलगी ही मुलगीच असते तिने कितीही चुका केल्या तरी पोटात घालणारे आई- वडिलच. तिने न विचारता, घरच्यांना अंधारात ठेवून लग्न केले तरी ते सगळं आई- वडिलांनी तिला माफ केलं. ज्योतीनगरातील सुनील दोंदे यांची मुलगी ज्योतिकाची ही विदारक प्रेमकहानी इथेच संपत नाही... अर्थात ती आता संपली आहे पण तिच्या मृत्यूनंतर. आयुष्यात पहिल्यांदा प्रेम केलं, ज्याच्यासोबत प्रेम केलं, त्याच्यासोबतच लग्न करण्याचं धाडस दाखवलं. पण त्यानेच दिलेला धोका तिच्या जणू न पचणाराच होता. त्यामुळे ती प्रचंड तणावाखाली राहू लागली. या तणावातून तिच्यात आलेले नैराश्य जीवनात आता काही उरले नाही हे वारंवार सांगत होतं... त्यातून मग तिने या जीवनाचा संपविण्याचा भयंकर निर्णय घेतला. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घरी कोणी नसताना तिने पंख्याला साडी अडकवून ही इहलोकीची यात्रा अध्र्यावरच संपवली. ज्योतिका (वय २७) माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात शिकत होती. पोलिसांनी तिच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा अभय, सासरा काशीनाथ कावळे आणि सासू विमल काशीनाथ कावळे यांना अटक केली आहे.