संतप्त विद्यार्थी परिषदेने कुलगुरूंचा पुतळा जाळला
प्रतिनिधी
औरंगाबाद : रोज या ना त्या कारणाने बदनाम होणाèया विद्यापीठ प्रशासनाचा कारभार सुधारण्यासाठी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे आणि उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी राजीनामा दिल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरूंच्या पुतळ्याचे दहन केले.
अभाविपचे शहर मंत्री सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या कार्यकत्र्यांनी हे आंदोलन केले. या वेळी बोलताना सुनील जाधव म्हणाले, की परीक्षा विभागात रोज नवनवीन घोटाळे उघडकीस येतात. संशोधन प्रक्रियाही रखडली आहे. विद्यापीठाच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप वाढला असून, याला जबाबदार कुलगुरू आणि उपकुलसचिव आहेत. त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, असे ते म्हणाले.