पाच पाकिटमार अटकेत
प्रतिनिधी
औरंगाबाद : कर्णपुरा यात्रेत सध्या भाविकांची गर्दी सध्या ओसंडून वाहत आहेत. याचा फायदा उचलून पाकिटमारांनी सध्या कर्णपुरा यात्रेत बस्तान मांडले आहे. नागरिकांची नजर चुकवून ते कधी पाकिट मारतात हे कळतही नाही. पोलिसांनीही त्यांच्यावर करडी नजर ठेवली असून, आतापर्यंत पाच पाकिटमारांना अटक करण्यात आली आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे हे विशेष.
कुशीवर्ताबाई पप्पू भोसले (२२, रा. मुकुंदवाडी), आरती सूर्यभान काळे (१९), शेख शफीक शेख इसार (२५, रा. जालना), राजू बागूल चव्हाण (३२, रा. बिडकीन), संतोष कडूबा पाटील (२५, रा. गारखेडा) अशी अटकेतील पाकिटमारांची नावे आहेत. पोलिस कर्मचारी शेख रहीम, मनोज चव्हाण, मिqलद आडवे, भानुदास सुताडे, महिला पोलिस भोपडे, राजगुरू यांनी ही कामगिरी पार पडली. पाकिटमारांवर पोलिस लक्ष ठेवून, नागरिकांनीही कुणाचा संशय आल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.