Home » » क्लिक करा, औरंगाबाद जाणा....

क्लिक करा, औरंगाबाद जाणा....

Written By Aurangabadlive on शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२ | ११:२५ PM

औरंगाबाद ( मराठी: औरंगाबाद, उर्दू: اورنگ‌آباد), हे महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती महानगर आहे. वाहन उद्योग आणि पेयनिर्मितीचे ते भारतातील महत्त्वाचे केंद्र आहे. औरंगाबाद मराठवाडा महसुली विभागाचे मुख्यालय आहे. ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी जगाच्या नकाशावर औरंगाबादची ओळख आहे. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत आहे. औरंगाबाद हे एक वेगाने वाढणारे शहर आहे.
 
औरंगाबाद हे नाव औरंगजेब (इ.स. १६५९ - इ.स. १७०७) ह्या मोगल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले असावे. औरंगजेबाने दिल्लीपाठोपाठ आयुष्याचा मोठा काळ औरंगाबाद आणि परिसरातच व्यतीत केला. त्यापूर्वी औरंगाबाद आज जेथे वसलेले आहे त्या खाम नदीच्या तीरावर याच जागी खडकी नावाचे छोटसे ग्राम वसलेले होते.

इतिहास

काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले. मलिक अंबरने ह्या शहराचे नाव फतेहपूर ठेवले. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी / फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला. १६४४ मध्ये तो आग्र्याला परत गेला. त्या नंतर १६८१मध्ये औरंगजेब मोगल बादशाह असताना पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेब इथेच राहिला. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद या छोट्याशा गावात औरंगजेबाची कबर आहे. १७०७ नंतर औरंगाबाद हैदराबादच्या निजाम राजवटीचा भाग म्हणून राहिले. इ.स. १८८९ मध्ये औरंगाबादेत पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला. निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅलि रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर इ.स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनींग कारखाने सुरू झाले.मलिक अंबरने इथे त्याच्या कारकीर्दीत एक पाणी-व्यवस्था उभारली होती, त्याच्या एका भागाचे नाव नहर-ए-अंबरी असे होते. तिचे अवशेष आजही दिसतात. तसेच येथे शहराच्या पाणचक्की भागात पुरातन लेणी कोरलेली आढळून येतात. ही लेणी सातवाहन काळातील असावीत असा अंदाज आहे.
भौगोलिकदृष्ट्या औरंगाबाद उत्तर अक्षांश १९° ५३' ४७" - पूर्व रेखांश ७५° २३' ५४" या ठिकाणी वसलेले आहे. शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगररांगांनी वेढलेले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ५५० मीटर उंचीवर ते वसलेले आहे. शहरातही अनेक लहानमोठ्या टेकड्या आहेत. त्यामुळे पाऊस वाहून नेणाऱ्या नाल्यांचे जाळे औरंगाबादमध्ये आहे.
तापमान: औरंगाबादचे वार्षिक तापमान ९ ते ४० अंश सेल्शियसच्या दरम्यान असते. शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्च हा आहे.
पर्जन्यमान: पडत असलेल्या पावसापैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७२५ मिलिमीटर आहे.

अर्थव्यवस्था

गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबादच्या जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅन्डर्ड सिल्कमिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादेमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरू झाल्या.

उद्योगधंदे

स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, बिअर आणि व्हिस्की तसेच शीतपेयांची निर्मिती हा औरंगाबादमध्ये भरभराटीला आलेला उद्योग आहे. या दोन्ही क्षेत्रातील उद्योगधंदे औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याशिवाय चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादेतील प्रमुख उत्पादने होत. औरंगाबादमध्ये निर्लेप, लुपिन लॅबोरेटरी, ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड, गरवारे पॉलिएस्टर्स ,औरंगाबाद सिल्क मिल्स, केविल सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रकल्प आहेत. शिवाय अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमूहांचे कारखाने औरंगाबादेत आहेत. वानगीदाखल त्यापैकी काहींची नावे अशी :

कला, संस्कृती

काही उल्लेखनीय मराठी नाटककारांचा औरंगाबाद शहराशी संबंध आहे. अजित दळवी यानी अखिल महाराष्ट्रात गाजलेली काही नाटके लिहिली, अलीकडे त्यांनी "कायद्याचं बोला" या चित्रपटाची पटकथा लिहिली. प्रतीक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, चिन्मयी सुर्वे अशा कलावंतानी आपल्या अभिनय-कारकीर्दीला आधी औरंगाबादला सुरूवात केली आणि मग ते मुंबईतील नाट्यक्षेत्रात चमकले. त्याआधी, कुमार, आलोक चौधरी, विजय दिवाण, त्र्यंबक महाजन अशा अनेक कलाकारांनी राज्य नाट्यस्पर्धा तसेच कामगार राज्य नाट्यस्पर्धा गाजवलेल्या व अनेकदा जिंकल्याही. 'वर्‍हाड निघालंय लंडनला' या विश्वविक्रमी नाटकाचे सर्वेसर्वा लक्ष्मण देशपांडे हेही औरंगाबादचे रहिवासी होते.

राजकीय

खासदार : चंद्रकांत खैरे ( शिवसेना )
आमदार :

विभागीय आयुक्त : Sanjeev Jaiswal
जिल्हाधिकारी : कुणाल कुमार
महानगरपालिका आयुक्त: डॉ.पुरुषोत्तम भापकर

प्रसिद्ध शिक्षण संस्था

विद्यापीठ

औरंगाबाद शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांचा कारभार पाहाते.

वैद्यकीय

  • शासकीय वैद्यकीय महविद्यालय
  • म.गा.मि. वैद्यकीय महविद्यालय
  • शासकीय दंतविद्या महाविद्यालय
  • भगवान होमियोपेथिक महाविद्यालय
  • फोस्टर डेव्हलपमेंट होमियोपेथिक महाविद्यालय्
  • वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी

कला, वाणिज्य आणि विज्ञान

  • सरस्वती भुवन महविद्यालय
  • देवगिरी महविद्यालय
  • विवेकानंद महविद्यालय
  • पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालय
  • डॊ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय
  • मौलाना आझाद महाविद्यालय
  • वसंतराव नाईक महाविद्यालय
  • छत्रपती शिवाजी महाविद्यालय
  • मिलिंद कला महाविद्यालय
  • मिलिंद विज्ञान महाविद्यालय
  • शासकीय महाविद्यालय
  • माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालय
  • महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय
  • मराठवाडा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी

मॅनेजमेन्ट कॉलेज

  • मराठवाडा इन्स्टीटयूट ऑफ मॅनेजमेन्ट & रिसर्च
  • महात्मा गांधी मिशन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
  • राजर्षी शाहू इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
  • देवगिरी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
  • मौलाना आ़झाद इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट


प्रेक्षणीय स्थळे

साभार : विकीपिडिया
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.