नव्वदच्या दशकात सौदागर, बॉम्बे, दिल से सारखे अनेक हिट चित्रपट देणारी मनिषा कोईराला गेल्या काही वर्षांपासून चित्रपट सृष्टीपासून दूर आहे. नुकताच तिने रामगोपाल वर्मांचा भूत रिटन्र्स हा चित्रपट स्वीकारला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती पुन्हा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. याबाबत मनिषा कोईराला विचारले असता, तिने सांगितले, की भूत रिटन्र्समध्ये काम करण्याचे कारण केवळ रामगोपाल वर्मा आहेत. कंपनी चित्रपटात काम केल्यानंतर मी त्यांची फॅन आणि मित्र दोन्ही झाले होते. लोक त्यांच्या चित्रपटाबाबत काहीही म्हणोत पण ते फार आवडतात. रामगोपाल त्या काही दिग्ददर्शकांपैकी एक आहेत, ज्यांच्याकडे प्रतिभा आहे आणि त्यांच्यासोबत काम करायला कुणालाही आवडेल. कंपनी हा माझ्या आयुष्यातील सर्वांत चांगला चित्रपट त्यांच्यामुळेच ठरला. त्यामुळेच त्यांनी जेव्हा भूत रिटन्र्समध्ये काम करण्याची ऑफर दिली तेव्हा मी नाही म्हणू शकले नाही. हा चित्रपट स्वीकारण्याचा आणखी एक उद्देश होता तो म्हणजे, मी आतापर्यंत एकही भीतीदायक चित्रपट केलेला नाही. भीतीदायक चित्रपट कसा असतो, याची अनुभूती घ्यायची होती. त्यामुळे सुद्धा हा चित्रपट करण्याची गरज मला वाटली. २००५ ते २०१२ अशा दीर्घ कालखंडानंतर पुन्हा मनिषा मोठ्या पडद्यावर झळकेल. १४ वर्षे चित्रपट सृष्टीत काढणाèया मनिषाने स्वतः चित्रपटाची निर्मिती करण्याचाही विचार सुरू केला आहे. तिने सांगितले, की कोणताही चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय मी गडबडीत घेणार नाही. पण लवकरच एका नव्या चित्रपटाची घोषणा मी नक्कीच करेल. माझे पूर्ण ल्ख qहदी चित्रपटांवर केेंद्रीत असल्याने मी करेल तर एखादा qहदी चित्रपटच निर्माण करेल. नेपाळी चित्रपटाची निर्मिती करण्याचा माझा विचारही नाही, असेही मनिषा म्हणाली.