प्रेम सांगून होत नाही. ते कुणावर, कधी होईल हेही सांगता येत नाही. नकळत एखाद्या व्यक्तीवर जीव जडला की ते प्रेम निस्वार्थी आहे, असं समजावं. त्यात कोणता स्वार्थ नसतो. ब्रिटनमध्ये कर्तव्यावर तत्पर असताना रूसी गुप्तहेर अॅना चॅपमॅन सोबतही असंच काहीसं घडलं. तिलाही पहिल्या नजरेत एका पुरूषाबद्दल आकर्षण निर्माण झालं. मग दोघांत मैत्री झाली आणि दोघांनी लग्नही उरकलं... पण तोपर्यंत ब्रिटिश पोलिसांचे हात अॅनापर्यंत पोहचले होते. गुप्तहेरीच्या आरोपाखाली तिला अटक झाली. रूसी सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे अॅनाची सुटका होऊ शकली. पण तिला रूसमध्ये पाठविण्यात आले. यामुळे पतीचा विरह सहन करण्याची परिस्थिती तिच्यावर आली. देशासाठी कर्तव्यावर असताना स्वतःच्या आयुष्याचाही विचार न करता अॅनाने लग्न केले, असे लोक म्हणतात, पण अॅनाला माहितेय, आपलं प्रेम खरं होतं. ते निस्वार्थी होतं. गुप्तहेरी कारवाया लपविण्याचं हत्यारं तर अजिबातच नव्हतं...
अॅनाकडे पाहिल्यानंतर कुणाही पुरूषाला सौंदर्याच्या जाळ्यात अडकवणे तिच्यासाठी अशक्य नाही, हे कळून चुकते. एखादी अप्सरा भासावी, अशा अॅनाला देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी लहानपणापासून होती. त्यापोटीच तिने गुप्तहेर होण्याचा मार्ग निवडला. रूसच्या सरकारी गुप्तहेर विभागात कार्यरत असताना तिला ब्रिटनमध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रिटनमध्ये गुप्तहेरीसाठी जाणे म्हणजे परत येण्याची शक्यता कमीच. पकडलो गेलो तर देशासाठी बलिदान होईल आणि सहिसलामत परतलो तर आपले नशिब म्हणून तिने ब्रिटनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिच्यासोबत अन्य सहकारीही होते. ब्रिटनमध्ये यापूर्वीही अॅना अनेकदा येऊन गेली होती. पण त्या वेळी कोणत्या उद्देशाने ती आली नव्हती. या वेळी प्रथमच ती एखाद्या कामानिमित्ताने आली होती. गुप्तहेरी करताना अॅनाला सौंदर्याचा वापर करण्याची पुरेपूर संधी होती. ब्रिटनमध्ये रूसी नागरिकांवर विशेष करून लक्ष ठेवले जाते. त्यामुळे अॅना विशेष दक्षता घेत होती. सर्व सहकारी ब्रिटनमध्ये इतरत्र पसरल्यानंतर अॅनाही कामाला भिडली. त्याच दरम्यान एका सार्वजनिक कार्यक्रमात तिची ओळख अॅलेक्स चॅपमनसोबत झाली. अॅलेक्सही इतर पुरूषांप्रमाणेच अॅनाच्या सौंदर्याने घायाळ झाला होता. अॅनाला बघताच तो तिच्या सौंदर्याचा चाहता झाला. अॅनाचाही जीव पहिल्याच नजरेत अॅलेक्सवर जडला. यातून दोघांची मैत्री झाली. काहीच दिवसांत मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे प्रियकर- प्रेयसी म्हणून वावरू लागले. सर्व बंधने झुगारून ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. आपल्या नात्याला बंधनात बांधण्याच्या उद्देशाने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ‘अॅना खुश्चेंकोङ्क ही ‘अॅना चॅपमनङ्क झाली. (तिचे आधीच आडनाव ‘खुश्चेंकोङ्क होते.) हे सर्व घडत असताना अॅनाचा यामागे कोणताही उद्देश नव्हता. निख्खळ प्रेमापोटीच ती हे सर्व करत होती. त्यानंतर काहीच महिन्यांनी दोघांच्या संसारावर नियतीची वक्रदृष्टी पडली. अॅनाला गुप्तहेरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. तिचे साथीदारही पकडले गेले होते. रूस सरकारने तिच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे तिची सुटका होऊन रूसमध्ये पाठविण्यात आले. अर्थात पुन्हा कधीही ब्रिटनमध्ये न येण्यासाठी. त्यामुळे अॅलेक्सची अन् अॅनाची ताटातूट झाली. अॅनाला जेव्हा गुप्तहेर म्हणून पोलिसांनी पकडले. तेव्हा अॅलेक्सचाही गैरसमज झाला. अॅनाने गुप्तहेरीसाठी आपला वापर करून घेतला, अशी भावना त्याच्यात निर्माण झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याचा हा समज दूर झाला. पण दोघे विरहाच्या आगीत झोकले गेले. आजही अॅनाच्या आयुष्यात अॅलेक्सशिवाय दुसरा कोणता पुरूष आलेला नाही. मॉडेqलग क्षेत्रात काम करताना तिने भलेही कपडे उतरवून ‘ोटोशूट केले असेल, पण तिच्या शरीरावर अजूनही तिने अॅलेक्सचाच अधिकार कायम ठेवला आहे. अॅनाने नुकताच पत्रकारांशी संवाद साधून आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या. त्या वेळी ती म्हणाली, अॅलेक्ससोबत लग्न करण्याचा निर्णय मी प्रेमामुळे घेतला. तो गुप्तहेरीचा भाग नव्हता तर खरेखुरे प्रेम होते. आज ते ब्रिटनमध्ये आहेत आणि मी रूसमध्ये. तरीही मला त्यांची सातत्याने आठवण येते. जेही दिवस आम्ही सोबत काढले ते आयुष्यात अविस्मरणीय झाले आहेत. त्यांचा सहवास मला अत्युच्च आनंद देणारा होता, असे अॅना म्हणाली. २९ वर्षीय अॅनाला अॅलेक्स पुन्हा एकदा आयुष्यात येईल, अशी आशा लागून आहे. सध्या ‘ॅशन जगतात यशोशिखरावर असलेल्या अॅनाने काहीच दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेशाचेही संकेत दिले आहेत. लवकरच ती सत्ताधारी पार्टीत प्रवेश करणार आहे.