बाई आणि बाटलीपासून दूर राहा, असा सल्ला कायम पुरूषांना मिळत आला आहे. पण तरीही या दोन्ही गोष्टींपासून स्वतःला वेगळे ठेवण्यात पुरूषांना यश आलेले नाही. फार कमी पुरूष असतील, ज्यांनी या दोन्ही गोष्टींपासून अलिप्त राहण्यात यश मिळवले आहे. आधुनिक जगाने बाटलीला काही प्रमाणात सभ्यतेत स्थान दिले आहे. त्यामुळे ‘पिण्यालाङ्क आक्षेप घेण्याची वृत्ती कमी झाली आहे. पण बाईचा संबंध नैतिक- अनैतिकतेशी जोडला गेल्याने परस्त्रीशी असलेले संबंध गैर मानले जातात. पूर्वी एक qकवा दोन तरूणींशी प्रेमसंबंध ठेवणे पुरूषाला शक्य होते. अधिकृतरित्या लग्न करून समाजाची मान्यताही त्याला मिळवता येत होती. पण आजकाल प्रेमाच्या आड अय्याशीचा उद्देश साध्य करण्याचे प्रकार वाढले आहेत. पैसा आणि नावलौकिकाच्या बळावर धनाढ्य मंडळी यात आघाडीवर आहेत. पण कोणत्याही वाईट मार्गाचा अंतही वाईटच असल्याने एक दिवस हाही मार्ग विनाशाकडेच घेऊन जातो. ज्यांची ओळख देशच नाही तर जगभरात आहे आणि लोक ज्यांचे कौतुक करताना थकत नाहीत, अशा मंडळींना नंतर घरातील मंडळीही विचारेनाशी होते. गेल्या काही महिन्यांत जगभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या अनैतिक संबंधाचा भंडाफोड झाला तेव्हा याची जाणीव सर्वांना झाली... कॅलिफोर्नियाचे माजी राज्यपाल अर्नाल्ड श्वार्जनेगर, इटलीचे पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी, आयएमएफचे चीफ डोमिनिक स्ट्रॉस, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन, गोल्फपटू टायगर वूड यांच्या आयुष्याचे वाटोळे व्हायला ‘बाईङ्कच जबाबदार ठरली आहे...
डोमिनिक स्ट्रॉस कान
हॉटेलमध्ये कर्मचारी महिलेवर केला बलात्कार
डोमिनिक स्ट्रॉस आयएमएफचे चीफ आहेत. स्ट्रॉस यांच्यावर हॉटेलमध्ये नोकराणीसोबत जबरदस्ती संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. ३२ वर्षांच्या ट्रिस्टेन बेनॉन या नोकराणीने आरोप लावला आहे, की ती जेव्हा डोमिनिक यांच्या खोलीत आली तेव्हा त्यांनी तिच्यासोबत अश्लील चाळे करून जबरदस्ती संबंध बनवले. सध्या या नोकराणीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आयएमएफच्या प्रमुखांनी अजून या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. डोमिनिक यांच्यावर अशा प्रकारचे आरोप लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांच्यावर २००८ मध्ये एका सहकारी महिलेने आणि हंगरीच्या अर्थशास्त्रज्ञ महिलेने लैंगिक संबंधाचा आरोप लावला होता. त्यावेळी डोमिनिक यांना दोषीही ठरवले होते.
टायगर वूड
अनैतिकतेच्या मर्यादा पार
गोल्फ खेळाचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाèया टायगर वूड्सने तर संबंध बनविण्याच्या सर्व मर्यादा पार केल्या. हॉटेलच्या अॅटेंडेन्सपासून तर पोर्न चित्रपटात काम करणाèया युवतींपर्यंत त्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. जेव्हा त्याच्या या संबंधाचा खुलासा होत गेला तेव्हा आठ ते दहा मुलींनी टायगर वूड्सशी असलेले संबंध स्वीकारले. त्याच्याकडून प्रचंड पैसे मिळाल्याने आपण संबंध ठेवले, असे या मुलींनी सांगितले. त्यामुळे खेळातला हा बादशाह त्याच्या चाहत्यांच्या नजरेतून उतरला. सोबत त्याच्या पत्नीने एलिननेही त्याला सोडले.
बिल क्लिंटन
मोनिकाच्या प्रेमात राष्ट्रपती दिवाना
१९९५ मध्ये मोनिका लेqबस्की व्हाईट हाऊसमध्ये इंटर्न म्हणून काम करत होती. काहीच दिवसांत राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या नजरेत तिचे यौवन भरले. क्लिंटन यांच्या लग्नाला २० वर्षे झाली होती आणि राष्ट्रपती बनून दोन वर्षेही झाली होती. याच दरम्यान मोनिका आणि क्लिंटन यांच्यातील मैत्री इतकी वाढली की दोघांत प्रेमसंबंध बनले. आपली प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी क्लिंटन यांनी मोनिकाला व्हाईट हाऊसच्या स्टाफमध्ये स्टानफ म्हणून ठेवले होते. पण त्यांचे हे संबंध दीर्घकाळ लपले नाहीत आणि एक वादळ बनून ते समोर आले व त्यांची सर्व इज्जत धुळीस मिळाली. २२ वर्षांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवणे त्यांना चांगलेच महागात पडले होते.
अर्नाल्ड श्वार्जनगर
मोलकरणीने केला संसार उद्ध्वस्त
कॅलिफोर्नियाचे माजी राज्यपाल अर्नाल्ड श्वार्जनेगर आणि त्यांची पत्नी मारिया श्रिवर यांचा संसार तुटण्याला त्यांच्याच घरात काम करणारी बाई कारणीभूत ठरली. काही दिवसांपूर्वीच ती सेवानिवृत्त झाली आहे. तिच्याशी अर्नाल्ड यांचे अनैतिक संबंध होते. अर्नाल्ड यांच्यापासून तिला एक मुलही झाले होते. ही बाब मारिया यांना माहित पडताच त्यांनी अर्नाल्ड यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. राज्यपालपद सोडल्यानंतर अर्नाल्ड यांनी स्वतःहून मारियाला आपल्या विवाहबाह्य संबंधाची कल्पना दिली होती. त्यांना वाटले मारिया समजून घेईल. पण घडले उलटेच. यावर अर्नाल्ड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते, की मी बायकोचा गुन्हेगार आहे. तिच्या भावना मला समजतात. पण केलेल्या वाईट कृत्याचे प्रायश्चित्त करण्याची संधी मला मारियाने द्यायला हवी होती.
सिल्वियो बर्लुस्कोनी
उतारवयात म्हातारचळ, पद-पैशांचा दुरूपयोग
इटलीची अभिनेत्री वेरोनिका लारियोसोबत दुसरे लग्न केल्यानंतर इटलीचे पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांचा संसार सुरळित चालला असता, पण मध्येच १८ वर्षीय लॅटीजियावर बर्लुस्कोनींचा जीव जडला. साहाजिक आहे की त्यांची पत्नी वेरोनिकाला ही बाब सहन झाली नाही आणि तिने मे २००९ मध्ये बर्लुस्कोनींना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. सध्या बर्लुस्कोनी ७४ वर्षांचे झाले आहेत. पण केसांचे ट्रान्सप्लांट आणि प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे समवयस्कांच्या तुलनेत ते अत्यंत कमी वयाचे वाटतात. शिवाय जवळ पद आणि पैसा दोन्ही असल्याने तरूणी त्यांच्याकडे आकर्षित होतात. ४२ वर्षांच्या एका अभिनेत्रीने गेल्या वर्षी खुलासा केला होता की, बर्लुस्कोनी पैसे देऊन आपल्या घरी युवतींना बोलावतात आणि संबंध ठेवण्यास प्रवृत्त करतात. त्यांनी अनेक तरूणींशी संबंध ठेवलेले आहेत. आतापर्यंत अनेक महिला, मुलींनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. सध्या त्यांच्यावर अल्पवयीन वेश्या रूबीवर बलात्कार केल्याचा खटला मिलान येथील न्यायालयात सुरू आहे.