प्रतिनिधी
औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालयाकडून आम्हाला विविध सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आम्ही संप का करू नये, असा प्रश्न विचारणारे पत्रक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आले आहे.
शासकीय दंत महाविद्यालयात दरवर्षी बीडीएस प्रथम वर्षासाठी ४० विद्याथ्र्यांना प्रवेश दिला जातो. या विद्याथ्र्यांसाठी आमखास मैदानावरील कॅन्सर हॉस्पिटलच्या मागे वसतिगृह आहे. बीडीएसला प्रवेश घेणाèयांमध्ये मुलींची संख्या अधिक असते. महाविद्यालयापासून सुमारे दीड किलोमीटर दूर असलेल्या या वसतिगृहाच्या रस्त्यावर टवाळखोर मुलांकडून या विद्यार्थीनींची छेडछाड होत असते. वसतिगृहासाठी कायमस्वरूपी महिला अधीक्षिका नाहीत. शिवाय तेथे सुरक्षारक्षकही नाही. याशिवायही विद्यार्थिनींना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते, असे विद्याथ्र्यांचे म्हणणे आहे. याविषयी दंत महाविद्यालयातील आंतरवासिता विद्यार्थी डॉ. आदित्य पतकराव यांनी सांगितले की, प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने विद्याथ्र्यांचे नुकसान होत आहे. विविध विभागात यंत्रसामुग्री अपुरी आणि निर्कष्ट दर्जाची आहे. रुग्णांना उपचार घेण्यासाठी असलेल्या खुच्र्याही मोडक्या आहेत. परिणामी रुग्ण आणि त्यांच्यावर उपचार करणारे विद्यार्थी डॉक्टरांना पाठदुखीचा त्रास सोसावा लागत आहे. विद्याथ्र्यांसाठी कॉमन रूम मिळावी, अशी आमची मागणी आहे.