प्रतिनिधी
औरंगाबाद : गॅस वितरकांकडे गॅसधारकांनी केवायसी फॉर्म भरण्यासाठी गर्दी केलेली आहे. खèया अर्थाने हा फॉर्म भरणे अनिवार्य असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. गॅसधारक हा फॉर्म दिवाळीपर्यंत भरू शकतात. एक स्वयंपाकघर एक सिलिंडर या नियमाप्रमाणे ग्राहकांना एकच कनेक्शन ठेवावे लागणार असून, त्यासाठी वर्षातून फक्त ६ सिलिंडर सबसिडीच्या दरात मिळणार असून, त्यानंतरचे सिलिंडर घेतल्यास सबसिडी मिळणार नाही; मात्र गॅस मिळेल. या वर्षी सप्टेंबर ते ३१ मार्चपर्यंत तीन सिलिंडर सबसिडीवर मिळणार असून, १ एप्रिल २०१३ पासून वर्षभरात फक्त सहा सिलिंडर्स सबसिडीवर मिळणार असल्याचे हिंदुस्थान पेटड्ढोलियम कॉर्पाेरेशनचे ज्येष्ठ व्यवस्थापक जयप्रकाश यांनी स्पष्ट केले आहे.
मराठवाडा, खान्देश आणि राज्यातील १४ जिल्ह्यांचे व्यवस्थापक असलेले जयप्रकाश यांनी केवायसी फॉर्म भरण्यावरून गॅसधारकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याचे मान्य करताना सांगितले की, गॅसधारकांनी घाबरण्याचे कारण नाही. भारत सरकारकडून मिळालेल्या आदेशानुसार १४ सप्टेंबर ते ३१ मार्चपर्यंत गॅसधारकांना सबसिडीवर तीन सिलिंडर्स देण्यात येणार आहेत. सबसिडीवर मिळणाèया (१४.२ कि.ग्रॅ.च्या) सिलिंडरची किंमत ४३८ रुपये ५० पैसे राहणार आहे. मात्र, वर्षभरात मिळालेल्या सहा सिलिंडरनंतर सातव्या सिलिंडरवर सबसिडी राहणार नसल्याने त्याची किंमत ९४६ रुपये ५० पैसे राहणार आहे. १९ कि.ग्र च्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,६८३ रुपये राहणार असून, डीईसी श्रेणीच्या सिलिंडरची किंमत १,१७८ रुपये ५० पैसे राहणार आहे. गॅसधारकांना त्यांच्या पुस्तिकेवर कॉम्प्युटराईज्ड पद्धतीने प्रत्येक गॅस सिलिंडरची नोंद राहणार आहे. योग्य माणसालाच सबसिडीची सिलिंडर मिळावीत, असे शासनाचे धोरण असल्याने हे पुस्तक महत्त्वाचे राहणार आहे. या पुस्तकावर गॅस सिलिंडरची संपूर्ण माहिती असेल. कोणाकडील पुस्तक गहाळ झाले असल्यास त्याने ४० रुपये भरून नवीन पुस्तक करून घ्यावे, सणासुदीच्या काळात गॅसपुरवठा कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.