औरंगाबाद : माथेफिरू बापाने त्याच्याच नऊ महिन्याच्या मुलाचा गळा कापल्याची थरारक घटना हर्सूल सावंगीत बुधवारी घडली. पत्नीशी झालेल्या भांडणाचा वचपा त्याने मुलावर काढल्याचे पोलिसांनी सांगितले.
अश्फाक शाह (३०) व त्याची पत्नी तब्बसूम यांच्या घरगुती कारणावरून भांडण झाले. यानंतर पत्नी मुलासह आई-वडिलांकडे राहण्यास गेली. बुधवारी अश्फाकने सासरी जाऊन नऊ महिन्यांच्या मुद्दसरला घरी आणले. त्यानंतर चार वाजेदरम्यान चाकूने त्याचा गळा कापला.