औरंगाबाद : अभियांत्रिकी शाखेच्या विद्याथ्र्याने काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत हा पोलिसाचा मुलगा आहे. क्रांतीचौक ठाण्याजवळील पोलीस कॉलनीत राहत होता.
भास्कर अशोक जावळे (१९) असे त्याचे नाव आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात हवालदार असलेले अशोक जावळे यांचा तो मुलगा. पंख्याला साडीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.