एससीपी नरेश मेघराजानी यांचा अजब उपाय

यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी या तरुणाचा मृतदेह क्रांतीचौक ठाण्यात जवळपास तासभर ठेवण्यात आला. सुरुवातीला एसीपी नरेश मेघराजांनी यांनी दांडगाई करत सबको शूट कर दो, असा आदेश दिला. पण गोळीबाराच्या धमकीलाही जनता न घाबरल्यामुळे पोलिसांना नरमाईची भूमिका घ्यावी लागली. नातेवाईकाच्या अर्जानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह तेथून घरी नेण्यात आला. एसीपी आणि जमावाच्या बाचाबाचीमध्ये वातावरण तणावपूर्ण झाले होते. तेव्हा उपस्थित हजारो नागरिक, मयताचे नातेवाईक व कार्यकर्ते संतप्त झाले. मयताची बहीण सुनयना जावळे हीदेखील संतप्त झाली. तुम्ही आम्हाला गोळ्या घालणार आहात काय? दबावाचे राजकारण आम्ही सहन करणार नाही. जे होईल ते होईल, अशी आक्रमक भूमिका जमावाने घेतली होती.