Home » , , » महिला, मुलींवर वक्रदृष्टी महागात पडणार!

महिला, मुलींवर वक्रदृष्टी महागात पडणार!

Written By Aurangabadlive on मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२ | ९:४३ AM

शहरात १५ विशेष पथके तैनात
औरंगाबाद : शहरातील महिला किंवा मुलींची छेड काढणाèया रोडरोमिओंना धडा शिकवण्यासाठी आता पोलिसांनीही कंबर कसली आहे. त्यांना वठणीवर आणण्यासाठी १५ विशेष पथके तैनात आहेत. प्रभारी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आजपासून १५ विशेष पथकांची स्थापना केली आहे.
दिल्लीतील बत्काराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर हा प्रतिबंधात्मक उपाय अंमलात आणला गेला आहे. प्रत्येक पथकात ४ पोलिस राहतील. मॉल्स, वर्दळीची, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, शाळा-महाविद्यालये, गार्डन, तसेच मुख्य चौकांमध्ये छेडछाड करणाèया भामट्यांवर ही पथके पाळत ठेवतील. पथकांतील पोलिस कधी वर्दीत, तर कधी सिव्हिल डड्ढेसमध्ये राहणार असून, काही फिक्स पॉइंटवर त्यांना तैनात केले जाणार आहे. ही पथके १ जानेवारीपर्यंत तैनात असतील, असे प्रभारी पोलिस आयुक्त तथा उपायुक्त अरविंद चावरिया यांनी सांगितले.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.