औरंगाबाद : महावीर चौकाजवळील लष्करी मेससमोर खांबाला बांधलेली बॅग आढळल्याने पोलिस कर्मचाèयांचे चांगलीच धावपळ झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
बंगाल येथे लष्करामध्ये नायब सुभेदार असलेले सुखदेव संपतराव जाधव (४६, रा. कासलीवाल तारांगण, पडेगाव) हे सुटी निमित्त बसने आज बाबा पेटोलपंप चौकात आले. त्यांच्याजवळ भली मोठी बॅग असल्याने ती लष्कर मेस समोरील एका खांबाला बांधून जाधव रिक्षा आणण्यासाठी गेले होते. नागरिकांना बेवारस बॅग दिसल्याने ताबडतोब पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये कपडे व दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जाधव हे परत आल्यावर खरा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांची विनाकारण धावपळ उडाली.