फेसबुकवर अश्लील फोटो टाकले होते
प्रतिनिधी
औरंगाबाद : ओळखीचा गैरफायदा घेत युवतीला ब्लॅकमेलिंग केल्या प्रकरणी पोलिसांनी एका युवकाला अटक केली असून, त्याच्याकडून दोन मोबाईल, सीमकार्ड जप्त केले आहे. त्याने युवतीचे फोटो फेसबुकवर अश्लील पद्धतीनेटाकले होते. लग्नाची मागणी करण्यासाठी ही ब्लॅकमेलिंग केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
हडको एन आठ परिसरातील एका युवतीने गुन्हे शाखेत तक्रार दिली होती. ती सिडको भागातीलच एका महाविद्यालयात बीसीएच्या अंतिम वर्षात शिकते. दोन वर्षांपूर्वी तिची ओळख विशाल प्रदीप खाडे (वय २३, रा. सारासिद्धीनगर, हर्सूल) याच्याबरोबर झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने मोबाइलवर तिचे फोटो काढले होते. नंतर फोटोच्या आधारे त्याने लग्नाची मागणी करीत ब्लॅकमेल करण्यासाठी हा प्रकार केला. पोलिसांनी विशाल खाडेला अटक केली.