विशेष कृती आराखडा
प्रतिनिधी
औरंगाबाद : शहर विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण मोहिमे यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शहरालगत असलेल्या गायरान व मनपाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. या कृती आराखड्यानुसार लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.
मनपा आयुक्त डॉ. भापकर यांनी शहरातील तसेच शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचा निर्धार केला आहे. शहरालगत असलेल्या जमिनीवर व मनपाच्या मालकी हक्काच्या जागेवर किती अतिक्रमण झाले याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये जवळपास साडेआठ हजार अतिक्रमण झाल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यात मनपा क्षेत्रात हर्सुल, जाधववाडी, मुकुंदवाडी, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, भावसिंगपुरा, जयसिंगपुरा, नारेगाव, ब्रिजवाडी, चिकलठाणा, गारखेडा, शहानूरवाडी, इटखेडा, मिटमिटा व पडेगाव आदींचा समावेश आहे. या भागात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चालले आहे. हे अतिक्रमण थांबविण्याचा वेळोवेळी मनपाने काम केले असले तरी त्यावर मनपा प्रशासन बंधन घालू शकले नाही. त्यामुळे मनपाने महसूल विभागासह कार्यवाही करण्याचे भूमिका घेतली असून त्यासाठी 24 तासाची मुदतही दिली आहे. ही मुदत संपल्यानंतर मनपाचे अतिक्रमण विभाग कामाला लागणार आहे. या जागेवर असलेल्या अतिक्रमण धारकांनी स्वत: अतिक्रमण काढावे असे, ही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून मनपाचे अतिक्रमण विभाग पुन्हा एकदा नव्या कृती आराखड्यानुसार कामाला लागणार आहे.