प्रतिनिधी
वैजापूर : चालकाचे हातपाय बांधून इंडिका कारसह रोख रक्कम व मोबाईल संच लुटून नेल्याची घटना मुंबई-नागपूर महामार्गावरील तिडी गावाजवळ घडली. वैजापूर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. आईला औरंगाबादहून आणण्याचा बहाण करत त्यांनी कार भाड्याने घेतली होती.
नाशिक येथील अतिक अब्दुल शेख यांची इंडिका औरंगाबादहून आईला आणायचे असे सांगून तिघांनी भाड्याने केली. चालक अतिक शेख हे तीन प्रवाशांसह नाशिक येथून औरंगाबादला जाण्यासाठी निघाले असता तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावरील तिडी गावापर्यंत पोहचल्यानंतर कारमधील तिघांनी चालकास कार थांबविण्याचे सांगितले. कार थांबविल्यानंतर या तिघांनी शेख अतिक यास गुप्तीचा धाक दाखवून बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर दोरीच्या साह्याने हातपाय बांधून शेतात फे कून दिले व इंडिका कारसह रोख दीड हजार रुपये व मोबाईल संच हिसकावून पोबारा केला. घटनेची माहिती चालक शेख यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी अतिक अब्दुल शेख, रा.नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.