अनेकांना झोपेत चालण्याची सवय असते. त्यांच्या या सवयीमुळे कधी कधी ते अडचणीतही सापडत असतात. ही सवय जीवघेणीही ठरू शकते. ही सवय लागते कशामुळे, याचे कोडे आतापर्यंत सर्वांनाच पडले होते. ते रहस्य आता उलगडले असून, वैज्ञानिकांनी दावा केला आहे, की डीएनएमधील विशेष क्रोमोसोममधील छोट्याशा दोषामुळे ही सवय मानवाला लागते. त्यामुळे माणूस झोपेत असूनही चालून एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी जातो.
अनेकदा कृष्णकृत्य लपविण्यासाठी आपल्याला झोपेत चालण्याचा आजार आहे, असे गुन्हेगार म्हणत असतात. हा आजार वास्तवात अनेक लोकांना असल्याने गुन्हेगाराचे फावत असते. पण नक्की हा आजार कुणाला आहे आणि कशामुळे होतो हे लवकर कळत नाही. याचे संशोधन करताना वॉqशग्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी आजाराचे मूळ शोधले. त्याबाबत संशोधकांचे नेतृत्त्व करणाèया डॉ. क्रिस्टिना जर्नेट यांनी सांगितले, की दहापैकी एक मुलाला आणि ५० वयस्कांपैकी एकाला हा आजार होऊ शकतो. या स्थितीला साम्नेम्बलियजम असेही म्हटले जाते. याकरिता डीएनएतील क्रोमोसोम २० जबाबदार आहे. हा जीन एका कुटुंबाच्या आरोग्य तपासणीत आढळून आला. पण प्रत्येक कुटुंबातील आजारी सदस्यामध्ये हाच जीन आढळेल, असे नाही. पण डीएनएतील क्रोमोसोमच्या दोषामुळेच हा आजार होतो, असे डॉ. जर्नेट म्हणाल्या. या संशोधनामुळे या आजारावर निदान शोधणे सोपे जाणार असून, त्यामुळे झोपेत चालण्याने होणारे संभाव्य नुकसान टळू शकेल, असेही त्या म्हणाल्या.