कुलगुरू लिहिणार राज्यपालांना पत्र
प्रतिनिधी
औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे गरीब विद्याथ्र्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, असा ठराव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत एकमताने पारित झाला. राज्यपालांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला. ही माहिती कुलसचिव डॉ. डी.आर. माने यांनी पत्रकारांना दिली.
अधिसभेच्या बैठकीला ६७ सदस्य हजर होते. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे अधक्षस्थानी होते. परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याशिवाय विविध विकासात्मक मुद्यांवर बैठकीत उहापोह झाला. १३ विषय अजेंड्यावर होते. विद्यापीठाअंतर्गत येणाèया सर्व महाविद्यालयांत अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या दुष्काळाचे सावट असल्याने अनेक गरीब विद्यार्थी फी भरण्यास असमर्थ आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे असल्याने त्यांचे शुल्क माफ करण्यात यावे, असा प्रस्ताव प्रा. संभाजी भोसले, पंडित तुपे, सुभाष राऊत, नितीन बागल, रवींद्र दभवी या अधिसभा सदस्यांनी मांडला. त्याला इतरांनी पाठिंबा दिला. यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरुंनी दिले.