लंडन - वाढत्या वजनामुळे आज अनेक जण परेशान आहेत. वजन कसे कमी करता येईल, यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू असतात. पण काही केल्या त्यात यश मिळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञांनी वजन कमी करण्याचा एक रामबाण उपाय सांगितला असून, पुरेशी झोप घेऊन वजन नियंत्रणात ठेवता येते, असा दावा त्यांनी केला आहे. सहा ते आठ तासांची झोप आणि नियमितरित्या व्यायाम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. अमेरिकेच्या ओरेगन येथील कैसर परमानेंट सेंटर फॉर हेल्थ रिसर्चच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे. त्यांनी संशोधनात ५०० लोकांना सहभागी करून घेतले. त्यांना झोपेची वेळ ठरवून देऊन रोज कमीत कमी तीन तास व्यायाम करण्यास सांगितले. सलग सहा महिने हा दिनक्रम अवलंबण्याची सूचना केली. सहा महिन्यांनी परिणाम समोर आले. त्यातील ६० टक्क्यांहून अधिक लोकांचे वजन साडेचार किलोंनी कमी झालेले दिसून आले.
Home »
» पुरेशी झोप घेतल्याने होतो लठ्ठपणा कमी