प्रतिनिधी
औरंगाबाद : दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतोय तोही अवघा ३० मिनिटे... त्यामुळे संतप्त झालेल्या हनुमाननगर येथील शेकडो महिलांनी पुंडलिकनगरचे जलकुंभ गाठले आणि ठिय्या आंदोलन सुरू केले.
हनुमाननगरला पाणीपुरवठ्याची अडचण बघून पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र जलवाहिनी टाकली आहे. मात्र तरीही हनुमाननगर भागाला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. गजानननगर भागाला सकाळी ९ वाजता पाणीपुरवठ्याची वेळ आहे; मात्र गेल्या आठवड्यापासून ११ वाजता पाणीपुरवठा होतो आहे. पुंडलिकनगरमधील काही गल्ल्यांना सुरळीत पाणी मिळते तर काही गल्ल्यांना पाणी कमी वेळ येते. गुलमंडी भागामध्ये तासभर पाणीपुरवठा होतो आहे. सर्व शहराला समान पाणी वाटपासाठी मनपाने दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला; मात्र त्यामध्ये अनियमितता असल्याचा आरोप नगरसेवक सूर्यकांत जायभाये यांनी औरंगाबाद न्यूज लाइव्हशी बोलताना केला.