मध्यंतरीच्या काळात कलाबाह्य झालेले पैजण पुन्हा फॅशनच्या दुनियेत आले असून त्याचे स्वरूप बदललं आहे. ते अधिक फॅशनेबल झाले आहेत. विशेषत: केप्रीवर एकाच पायाच अँकलेट घालण्याची फॅशन मुलींमध्ये होऊ लागली आहे. काही वर्षांपूर्वी हिंदू संस्कृतीमध्ये पैजण हा अलंकार घालणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण मानलंजात असे. मुली आणि स्त्रिया जाडजूड व मोठ्या डिझाइन्सचे चांदीचे पैजण घालत असत. पण आता काळानुसार बदल होत गेल्यामुळे हेच पैजण नवीन स्वरुपात पुन्हा फॅशनमध्ये आले आहे. इंग्रजीमध्ये त्यांना अँकलेट म्हटलं जातं म्हणून हेच स्टायलिश नाव आता रुढ झालं आहे. यात धातू, डिझाइन्स, घालण्याची पद्धती व सर्वांमध्ये बदल झाला आहे. साखळी, गोफ, डायमंड लावलेले, मीनावर्क केलेले अशा अनेक आकर्षक डिझाइन्समध्ये पैजण मिळायला लागले आहेत. लग्न कायामध्ये अशा प्रकारच्या पैजणांना विशेष मागणी असते, पण हल्ली चांदीच्या पैजणांपेक्षा छोट्या-छोट्या मण्यांनी आणि मोत्यांनी तयार केलेल्या पैजणांची जास्त मागणी आहे. पूर्वी साड्यांवर पैजण घालत असत, त्यानंतर पंजाबी डड्ढेसवरसुद्धा पैजण घालण्याची फॅशन होती. पण हल्ली जीन्सवर एकच पायात पैजण घालण्याची फैशन आहे. विशेष म्हणजे केप्रीज-शॉर्ट टॉप, हायहिल्स आणि डाव्या पायात अँकलेट ही फॅशन सध्या खूप फॉर्ममध्ये आहेत. घुंघरू असलेले पैजण आजकालच्या मुलींची पहिली पसंत आहे.