फुलं, पानं, कुयरी, नागफणी अशा सुंदर डिझाइनमध्ये कुंदन , खडे लावून सजवलेले बाजूबंद किंवा वाक्या सध्या फॅशन इन आहेत. जीन्स-कुर्ती किंवा पंजाबी डड्ढेसवर चालतील अशा पारंपरिक पण सध्या टड्ढेंडी ठरलेल्या बाजूबंद या दागिन्याविषयी... टॅटू असो नाहीतर मेंदीने रंगवलेला असो खड्यांचा किंना सोन्याचा असला तरीही चालेल.. पण सध्या तरी फॅशनसाठी बाजूबंद हवाच. नथ , पैंजण, जोडवी यांच्यासारखाच वाकी म्हणजेच बाजूबंद हा तसा जुना दागिना. श्रीमंती थाटाचा हा दागिना फार पूर्वी रोजच्या वापरात असायचा. मग परिस्थितीनुसार फक्त लग्नकार्यात किंवा सणासुदीला वापरले जाणारे बाजूबंद अलिकडे पुन्हा एकदा रोजच्या वापरात आले आहेत. अर्थात गरजेनुसार त्याचं स्वरूप मात्र बदललेलं आहे. जुन्या पारंपरिक डिझाइन्सबरोबर हल्ली कड्याच्या स्वरूपातही या वाक्या किंवा बाजूबंद बाजारात मिळतात. दोèयात गुंफलेले ऑक्साइडचे बाजूबंद तर कॉलेजच्या मुलींमध्ये सॉलिड इन आहेत. याशिवाय रंगीत खडे असलेल्या किंवा बेटेंक्सच्या किंवा १ ग्रॅमच्या वाक्याही महिलांमध्ये खूपच प्रिय आहेत. कुर्ती किंवा स्कर्ट आणि स्लीवलेस टॉपवर घालण्यासाठी तर पितळ आणि तांब्यापासूनही बाजूबंद तयार केले जातात. मुलींनी नाजूक दागिनाच घालावा , असा कधी नियम नव्हताच. शिवाय आता कोणतीही मुलगी तो आपणहून मानणारही नाही. चित्रविचित्र काही गोष्टी करायला आताच्या मुलींना आवडतं. म्हणूनच बाजूबंदाचा हा नवा प्रकार त्यांच्यात हिट ठरतोय. खड्याचे आणि कुंदनचे बाजूबंद मुलींमध्ये सगळ्यात हिट आहेत. फुलं, पानं, कुयरी यांसारख्या नाजूक डिझाइनचे बाजूबंद तरुणींच्या सर्वाधिक पसंतीचे आहेत. नागफणी या प्रकारच्या बाजूबंदात नागाच्या फण्यासारखं डिझाइन सोनं , खडे , कुंदन किंवा हिèयाने सजवलेलं दिसतं. नागफणीसारखीच वेल, शंकरपाळं असलेली डिझाइनही मुलींना पसंत पडतात.
बाजूबंदची वेड लावणारी फॅशन
Written By Aurangabadlive on गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१२ | ३:०७ AM