कधी रुचते... कधी खटकते... आणि म्हणूनच ती फॅशन असते. सध्या चर्चेत असलेला आणि ग्लॅमरस लूक देणारा टड्ढेंड आहे तो अॅनिमल प्रिटचा. जंगली प्राणी टड्ढेंड बनून कुर्तीज, टॉप्स, वनपीस मिडीजवर दिसू लागलेत. फक्त कपडेच नव्हे तर त्याला मॅचिंग अशा पर्सेस, ज्वेलरी, अॅक्सेसरीजही मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात दिसतायत. फॅशन इंडस्टड्ढीचं मुलींवर, महिलांवर नेहमीच जरा जास्त प्रेम असतं. त्यांच्या आवडत्या कपड्यांवर सतत प्रयोग होत असतात. त्यामुळे ते कधी - कधी अनोळखीही वाटू लागतात. अनोळखी यासाठी कारण प्रत्येक टड्ढेंडला कुठलंच नाव नसतं. सध्याचा चर्चेत असलेला आणि ग्लॅमरस लूक देणारा टड्ढेंड म्हणजे अॅनिमल प्रिंटचा. शहरातील लोकांना पिंजèयात दिसणारे वाघ, झेब्रा, चित्ता हे जंगली प्राणी नवीन टड्ढेंड बनून कुर्तीज, टॉप्स आणि वन पीस, मिडीजवर दिसू लागले आहेत. हा टड्ढेंड थोडा शायनी आणि पार्टी लुक देणारा आहे म्हणून तो हटके मानला जातोय. पण अॅनिमल प्रिंटमुळे तेवढाच सोफिस्टिकेटेड लुकसुद्धा येतो बरं. हा टड्ढेंड सामान्य महिलांपासून ते आपले तारे - तारका सगळ्याचजणी कॅरी करताना करताना दिसत आहेत. त्यातही तरुण मुली या टड्ढेंडला जास्त फॉलो करताना दिसतात. अॅनिमल प्रिंट म्हणजे चक्क वाघ, ससा, मांजर, चित्ता, झेब्रा, सिंह, मोर यांच्या कातडीचं हुबेहूब प्रिंट कपड्यावर कॉपी करणं. एवढंच नाही तर पक्षी आणि प्राण्यांची चित्रं नुसत्याच फक्त मुलींच्याच नव्हे तर मुलांच्याही टी - शर्टसवरही छापलेले दिसून येतात. हल्ली मार्केटमध्ये अशा प्रिंट्सच्या लेगिंग्जसुद्धा मिळतात. लेपर्ड प्रिंटींग, टायगर प्रिंटींग, झेब्रा प्रिंटींग या प्रकारांची मार्केटमध्ये खूप चलती आहे. या प्रिंट्सच्या साड्या पण मार्केटमध्ये आल्या आहेत. अगदी अभिनेत्रींपासून ते सर्वसामान्य घरांतल्या मुलीसुद्धा या प्रकारच्या प्रिंट असलेल्या साड्या वापरतात. फिल्मी नट्या तर ही प्रिंट असलेली वन पीस मिडी कायम वापरतात. हे झालं कपड्यांचं. सांगायची बाब म्हणजे नुसत्या कपड्यावरच ही प्रिंट दिसून येत नाही तर लेडीज पर्सेस, बॅग्जवर या प्रकारची प्रिंट बघायला मिळते. प्लेन आणि सोबर कुर्तीज आणि टॉप्सवर या प्रिंटची पर्स घेतली तर नक्कीच ती उठून दिसते.
